Goa Budget 2023 : यंदाचा अर्थसंकल्प सर्वस्पर्शी : दिव्या राणे

प्रत्येक क्षेत्रासाठी योग्य तरतूद
Deviya Rane
Deviya RaneDainik Gomantak

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वस्पर्शी आणि उत्तम आहे, अशी प्रतिक्रिया पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक क्षेत्रासाठी योग्य अशी आर्थिक तरतूद केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आरोग्य, वन खाते, निसर्ग पर्यटन यांच्या वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी भरीव तरतूद केली आहे. फायबर केबलिंगसाठी मुख्यमंत्र्यांनी 700 कोटींची तरतूद केली आहे. महिलांच्या सशक्तीकरणास वाव देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी गृह आधार, लाडली लक्ष्मी या योजनांसाठी चांगली तरतूद केली आहे, अशी माहिती दिव्या राणे यांनी दिली.

Deviya Rane
Mayem : मयेतील मारहाणप्रकरणी सहाही संशयितांना रिमांड

तसेच काजू उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची आमची जी मागणी होती त्याची पूर्तताही या अर्थसंकल्पात झाल्याचे त्या म्हणाल्या. याबरोबरच काजू फेणीच्या विक्रीसंदर्भात अबकारी खात्याने विविध देशांशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच याबाबत देशातील राज्यांशीही असाच पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

काजूसाठी आधारभूत किंमत 125 वरून 150 रु. अशी वाढविण्यात आली आहे. तर नारळासाठीची आधारभूत किंमत 12 वरून 15 रु. अशी करण्यात आली आहे. तांदळासाठी आधारभूत दर 20 वरून 22 रु. असा वाढविला आहे. कृषी, मत्स्यपालन, पशु व्यवसाय यासाठी एकूण 552 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर कृषी खात्यासाठी 277 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

- दिव्या राणे, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com