Ganesh Chaturthi: गोव्यात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी

केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव साजरा करण्यास भाविक सज्ज झाले आहेत.
Ganesh Chaturthi: गोव्यात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी
गणेश चतुर्थीच्या सजावटीचे काम करतांना युवकDainik Gomantak

दाबोळी: गणेश चतुर्थीला काहीच दिवस शिल्लक आहे. लोकांनी आपली तयारी सुरू केली आहे. लोकांनी आपला गणरायाच्या मुर्त्या आगाऊ नोंदणी करुन ठेवल्या आहेत. दरम्यान भाविकांनी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू केली असून गेल्या वर्षी कोरोनामुळे या उत्सवावर विरजण पडले होते. त्यानुसार दीड दिवसांचा गणेश उत्सव (Ganesh Utsav) साजरा करण्यात आला होता.

गणेश चतुर्थीच्या सजावटीचे काम करतांना युवक
गोव्यात सार्वजनिक तक्रार निवारण केंद्र सुरू करणार; मुख्यमंत्री

दरम्यान यंदा सरकारची नियमावली काहीही असो भक्तांनी मात्र तयारी सुरू केलेली आहे. अनेकांनी बाजारातून कागद,माळा, थर्माकोल घेऊन सजावट करण्यास सुरुवात केली आहे. झुवारीनगर येथे एका फॅक्टरीत वेगवेगळ्या डिझाईनच्या थर्माकोल कटिंग करण्यात आले आहेत. युवक थर्माकोल सजावटीचे सामान आणून कामाला लागले आहेत.

गणेश चतुर्थीच्या सजावटीचे काम करतांना युवक
Goa Bhumiputra Bill: धनगर बांधवांची 415 घरे नावावर होणार

दरम्यान कालचा रविवार युवा वर्गाचा सजावटीसाठी राहिला. जास्तीत जास्त सजावटीचे काम उरकून काढण्यात युवकांनी प्राधान्य दिले. तसेच यात लहान मुलांचाही सहभाग दिसला. यात पुढील दोन-तीन दिवस कसरतीचे असणार आहे. मात्र यंदाचा गणेशोत्सव आपण कोणत्याही परिस्थितीत धडाक्यात साजरा करणारा याच दृष्टीने प्रत्येक जण कामाला लागला आहे. तशी तयारी आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठीची ठेवली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com