भक्तिगीतांचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

dainik gomantak
सोमवार, 29 जून 2020

सर्वांना हा अल्बम निश्‍चितच आवडेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

दोनापावला,

जॉन अगियार लिखित ‘दामोदरा रे दामोदरा’ या व्हिडिओ भक्तिगीतांचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ‘दामोदरा रे दामोदरा’ या गीतांचे गायन युवा गायिका समिक्षा भोबे काकोडकर यांनी केले आहे. काल (ता. २७) झालेल्या या प्रकाशनाचे वेळी राज्यपालांसमवेत जॉन अगियार व प्रशांत काकोडकर हे उपस्थित होते. या गीतांना सिंधुराज कामत यांनी संगीतबद्ध केले असून ध्वनी मंगेश स्टुडिओ येथे दिलीप वझे यांनी रेकॉर्डिंग केले आहे. सिनेमाटोग्राफी, संपादन व दिग्दर्शन प्रशांत काकोडकर यांनी केले आहे. सर्वांना हा अल्बम निश्‍चितच आवडेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

संबंधित बातम्या