मेळावली आंदोलनकर्त्यांच्या अटकेची आखली व्यूहरचना

DGP Mukesh Kumar Meena holds joint meeting at IRB Camp at Walpai
DGP Mukesh Kumar Meena holds joint meeting at IRB Camp at Walpai

मेळावली: शेळी-मेळावली येथे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी वाळपई येथील आयआरबी कॅम्पमध्ये संयुक्त बैठक तातडीने संध्याकाळी आयोजित केली असून त्यामध्ये जिल्हाधिकारी, मामलेदार, सीमांकन अधिकारी, पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे.

सर्व पोलिस स्थानकातील उपनिरीक्षक व त्यावरील पदाच्या अधिकाऱ्यांना वाळपईत जाण्याचे निर्देश त्यांनी काढले आहेत. आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देणाऱ्या तसेच मेळावली आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांना पोलिसांनी लक्ष्य करून त्यांना अटक करण्याची व्यूहरचना सुरू झाली आहे. नेत्यांना गजाआड करून हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यविरुद्ध कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यानीच दिल्याने पोलिसांनी पूर्णपणे तयारी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरू केली आहेत.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com