मोप विमानतळासाठी धारगळ गावालाही 'प्रकल्पग्रस्त' दर्जा मिळण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

मोप येथील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाच्या रस्त्यासाठी भू संपादन केले जाणार म्हणून धारगळ गावाचा समावेश प्रकल्पग्रस्त गावांच्या यादीत होण्याची शक्यता आहे.

पणजी :  मोप येथील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाच्या रस्त्यासाठी भू संपादन केले जाणार म्हणून धारगळ गावाचा समावेश प्रकल्पग्रस्त गावांच्या यादीत होण्याची शक्यता आहे. या गावांना मोप विमानतळ प्रकल्पात रोजगारासाठी पहिले प्राधान्य असेल. सध्या मोप परिसरातील सहा गावांना हा दर्जा आहे. या गावच्या पंचायतींना तसे पत्र मात्र सरकारने अद्याप पाठवले नसल्याने त्याबाबत काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.

Goa Budget 2021: गोवा अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पासून

या प्रकल्‍पासाठीचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने 60 मीटर रुंदीच्या या रस्त्यासाठी दोन्ही बाजूला प्रत्येकी 10 मीटरची जागा मोकळी ठेवावी लागणार असल्याने त्‍याविषयी जनतेत नाराजी आहे. यातून सुट मिळावी अशी त्यांची मागणी आहे. धारगळला जीएमआर कंपनीची रुग्णवाहिका सेवा द्यावी, काही घरे वाचवण्यासाठी मार्गाच्या आराखड्यात किंचित बदल करावा अशा काही मागण्या पुढे आल्या आहेत. त्यावर सरकारी पातळीवर विचार सुरु आहे.

कळंगुट वेश्या प्रकरणात परप्रांतीय तरुणांच्या पुन्हा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

संबंधित बातम्या