Dhavali Illegal Scrap Yard :ढवळीतील बेकायदा भंगारअड्डे हटवा

कवळे ग्रामसभेत मागणी : अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
Goa Panchayat
Goa PanchayatGomantak Digital Team

Goa Panchayat : कवळे पंचायतीच्या आज झालेल्या विशेष ग्रामसभेत ढवळी भागातील बेकायदा भंगारअड्ड्यांचा प्रश्‍न चर्चेला आला असता हे भंगारअड्डे त्वरित हटवा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. उद्या शुक्रवारी १२ रोजी बेकायदा भंगारअड्डा प्रकरणाची सुनावणी फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात असून या सुनावणीवेळी पंचायतीने प्रखरपणे हा विषय मांडताना भंगारअड्डे हटवण्याची नोटीसच घेऊन यावे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

कवळे पंचायतीच्या या ग्रामसभेला सरपंच मनुजा नाईक तसेच उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर इतर पंच सदस्य, पंचायत सचिव व ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या शुक्रवारी ढवळीतील आरके या सर्वांत मोठ्या भंगारअड्ड्याला आग लागल्याने मोठा हाहाकार उडाला होता.

धुराच्या लोटांमुळे तसेच रासायनिक द्रवामुळे लोकांचे जीणे मुश्‍किलीचे झाले होते, त्यामुळे महामार्गालगतच असलेल्या या बेकायदा भंगारअड्ड्यामुळे मोठा धोका मानवी जीविताला असतानाही न्यायालयात धाव घेऊन तात्पुरती स्थगिती हे भंगारअड्ड्यांचे मालक कसे काय घेऊ शकतात, असा सवाल ग्रामस्थांनी केला.

Goa Panchayat
रोजगारासाठी गोव्यात येण्यापूर्वीच घात झाला, ट्रेनमध्ये चढताना मजुराचा पाय घसरला अन्...

तिसऱ्यांदा महामार्ग बंद

ढवळी - फोंडा - बोरी महामार्ग आतापर्यंत तिसऱ्यांदा बंद करण्यात आला. भाषावदावेळी 1986 साली महामार्ग बंद झाला, त्यानंतर 2019 मध्ये कोविड काळात सर्वच महामार्ग काही काळ बंद होते, तर आता बेकायदा भंगारअड्ड्याला आग लागल्याने हा महामार्ग बंद करावा लागला. पंचायतीने हे धोकादायक भंगारअड्डे त्वरित हटवून त्यांना अन्य कुठेही जागा द्यावी, असे ग्रामस्थ म्हणाले.

Goa Panchayat
Fish Price Hike in Goa: अवकाळी पावसाचा मासेमारीला फटका; मासळीचे भाव भिडले गगनाला

विनाकारण पाण्याची नासाडी!

या बेकायदा भंगारअड्ड्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. आग विझविण्यासाठी हे पाणी वापरावे लागले. त्यातच अग्निशमन दल आणि पोलिसांचा वापर झाला. लोकांच्या पैशातून कर भरला जातो आणि बेकायदेशीर कृत्यांना निस्तरण्यासाठी जनतेच्या पैशांचा चुराडा केला जातो, हे असे चालणार नाही. त्यासाठी कवळे पंचायतीने प्रखर विरोध करताना हे अड्डे नष्ट करण्याची नोटिस घेऊनच यावे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com