शाश्‍वत समाजासाठी मटेरियल्स सायन्स आणि इनोव्हेशन

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

शाश्‍वत समाजासाठी मटेरियल्स सायन्स आणि इनोव्हेशन या विषयावर धेंपे कॉलेजने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.

पणजी, ता. २५ : शाश्‍वत समाजासाठी मटेरियल्स सायन्स आणि इनोव्हेशन या विषयावर धेंपे कॉलेजने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. खांडोळा येथील शासकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्‍या ऑनलाईन परिषदेला केमिस्ट्रीतील २०१९चे नोबेल पारितोषिक विजेते प्रा. अकिरा योशिनो हे बीजभाषण करणार आहेत. 

२६ ते २७ ऑगस्टपर्यंत ही आंतरराष्ट्रीय परिषद होणार असून यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. या दोन दिवसीय परिषदेत भारत, जपान, पोर्तुगाल व नेपाळमधील ११ वक्ते व १८ संशोधक मटेरियल सायन्स क्षेत्रातील हल्लीच्या ट्रेंड्सवर आपले विचार मांडतील. लिथीयम आयन बॅटरीचा प्रवास, स्मार्ट नॅनोमटेरियल्स, नॅनो गोल्ड पार्टिकल्स, नॅनोकार्बन, कार्बन नॅनोट्यूब्ज, ग्राफिन मटेरियल्स, ग्रीन सिंथेसिस व त्यांचे ॲप्लिकेशन्सवर हे वक्ते बोलणार आहेत. पहिल्या दिवसाचे प्रक्षेपण https://youtu.be/FGqHBrutdIM आणि दुसऱ्या दिवसासाठी https://youtu.be/Op6ie6HGJwY ही यूट्यूब लिंक असेल.

संबंधित बातम्या