धेंपो फुटबॉल क्लब अकादमी पुन्हा सक्रिय

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

कोविड-19 महामारीमुळे उदभवलेली परिस्थिती निवळू लागल्यानंतर धेंपो स्पोर्टस क्लबने निवासी फुटबॉल अकादमी पुन्हा सक्रिय केली आहे.

पणजी : कोविड-19 महामारीमुळे उदभवलेली परिस्थिती निवळू लागल्यानंतर धेंपो स्पोर्टस क्लबने निवासी फुटबॉल अकादमी पुन्हा सक्रिय केली आहे. शनिवारी 48 खेळाडू प्रशिक्षणासाठी एला-जुने गोवे येथील निवासी अकादमीत परतले. अकादमीतील प्रत्येक खेळाडू, कर्मचारी यांच्या आरोग्यसुरक्षेस प्राधान्य देत आणि आवश्यक उपाययोजनांबाबत सखोल चर्चा करून क्लब व्यवस्थानाने अकादमी कार्यान्वित करण्याचे ठरविले आहे, असे धेंपो क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी नमूद केले.

चर्चिल ब्रदर्सला ट्राऊ एफसी रोखले

खेळ आव्हानावर मात करण्यास शिकवते, अकादमीत खेळाडू परतल्यामुळे आनंदित असून खेळाडूंच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासाची प्रक्रिया आपण जवळून अभ्यासत असल्याची प्रतिक्रिया धेंपे यांनी दिली.  धेंपो क्लबच्या निवासी अकादमीत 48 खेळाडू आहेत. यामध्ये 15 वर्षांखालील व 18 वर्षांखालील वयोगटातील प्रत्येकी 24 खेळाडूंचा समावेश आहे.

अकादमीत खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक कल्याणावर भर दिला जाईल. सुरवातीच्या काही आठवड्यांत खेळाडूंच्या दर्जात्मक चाचणीस प्राधान्य असेल. त्यानंतर क्षमतेनुसार टप्प्याटप्प्याने खेळाडूस तयार केले जाईल, असे धेंपो क्लबच्या तांत्रिक संचालक अंजू तुरांबेकर यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या