धोंड भक्तांकडून शिरगावात 70 हजार नामस्मरण

शिरगावात लईराई जत्रेनिमित्त ह. भ. प. सुहास वझेबुवांचे प्रबोधनात्मक कार्य
Dhond in Shirgaon
Dhond in ShirgaonDainik Gomantak

डिचोली : शिरगावची प्रसिद्ध लईराईची जत्रा एक दिवसावर येऊन ठेपली आहे. शिरगावसह संपूर्ण डिचोली तालुक्यात सध्या भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. शिरगावच्या श्री लईराई देवीचे व्रत पाळणाऱ्या धोंड भक्तांकडून 70 हजार सामूहिक नामस्मरण जप करण्यात आला आहे.

Dhond in Shirgaon
लाखेरेत 52 धनगर बांधव धोंड एकत्रितपणे पाळतात; लईराईचे व्रत

गोव्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. सुहासबुवा वझे यांनी शिरगाव येथे श्री लईराईच्या मंदिरात हा उपक्रम राबविताना धोंड भक्तगणांना मार्गदर्शनही केले. नामस्मरण उपक्रमाला धोंड भक्तगणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुरुषांसमवेत महिला धोंड भक्तगणही सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रबोधन करताना सुहासबुवा वझे यांनी देव, देश, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. समाजात एकता निर्माण व्हावी. हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. व्रत पाळताना धोंड भक्तगणांनी शिस्तीचे पालन करावे. देवीचा अपमान होणार असे कृत्य करू नये, असे आवाहनही वझेबुवांनी केलं आहे.

Dhond in Shirgaon
मोठी बातमी; शिरगावच्या जत्रेची तारीख ठरली

शिरगावच्या लईराई देवीची जत्रा 5 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. लईराई देवीचे देश-विदेशात असंख्य धोंड भक्तगण आहेत. यंदा जत्रेवर कोणतेही निर्बंध नसल्याने धोंडांसह भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. कोरोना निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून शिरगावच्या लईराईची जत्रा मर्यादित स्वरुपात साजरी केली जात होती. भक्तांना शिरगावात येण्यासाठी निर्बंधही लादण्यात आले होते. मात्र यावर्षी प्रथमच भक्तांना जत्रेमध्ये सहभागी होता येणार आहे. जत्रा होणार असल्याने भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. होमखणासाठी लागणारी लाकडंही आणण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. देवस्थान समितीही जत्रेसाठी तयारीला लागली आहे. 5 मेपासून ही जत्रा सुरु असेल, तर 9 मे पर्यंत कौल उत्सव साजरा केला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com