गोवा सुराज्य पक्षाच्या तिकीटावर ‘आरजी’चे उमेदवार निवडणूक लढतील ; मनोज परब
Manoj ParabDainik Gomantak

गोवा सुराज्य पक्षाच्या तिकीटावर ‘आरजी’चे उमेदवार निवडणूक लढतील ; मनोज परब

मनोज परब यांचा ‘गोमन्तक’शी संवाद : ‘आरजी’चे व्हिजन डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात

पणजी : राज्याच्या राजकारणात नव्याने दाखल झालेल्या ‘रिव्होल्युशनरी गोवन्स’च्या (Revolutionary Goans) गोवा सुराज पक्षाचा पोगो बिलाचा आग्रह कायम असून, राज्याचा राज्यकारभार कसा असावा यासाठी तज्ज्ञांच्या साहाय्याने ‘व्हिजन डॉक्युमेंट’ बनवण्यात येत असून लवकरच ते जाहीर केले जाईल.

गोवा सुराज पक्षाने संपूर्ण पक्ष ‘आरजी’ला दिला असून उमेदवार गोवा सुराज्य पक्षाच्या तिकिटावर ‘आरजी’चे उमेदवार निवडणूक लढतील, अशी माहिती संयोजक मनोज परब यांनी दिली आहे. परब यांनी सोमवारी गोमन्तक कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या भविष्यातील योजनाही शेअर केल्या. यावेळी ‘आरजी’चे अध्यक्ष विश्वेश नाईक, विरेश बोरकर उपस्थित होते.

Manoj Parab
गोवा आर्ट अँड कल्चर विभागाचा निकाल जाहीर

मनोज परब (Manoj Parab) म्हणाले, गोवेकरांच्या हितासाठी ‘व्हीजन डॉक्युमेंट’ बनवण्याचे काम सुरू आहे. राज्यातील नोकऱ्या, शिक्षण, शेती- शेतजमीन यासारख्या मूलभूत विषयांबाबत सखोल अभ्यास करून हा व्हीजन डॉक्युमेंट बनवण्यात येत आहे. हाच दिशादर्शक ठेवून सुराज पक्ष त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करेल. हा सुराज पक्षाचा जाहीरनामा असू शकतो. हा ‘डॉक्युमेंट’ राज्यातील सर्व घराघरांमध्ये देण्यासाठी आरजीचे कार्यकर्ते प्रयत्नशील असणार आहेत. तसा सर्व्हे आम्ही सुरू केलेला आहे, असेही ते म्हणाले.

‘व्हिजनरी’ उमेदवार हवा आपण ज्याला निवडून आणू अशा उमेदवाराकडे ‘व्हिजन’ असायला हवी. तशाच पद्धतीची निवडणूकही असायला हवी. केवळ चेहऱ्यांना मते देण्यात काहीच अर्थ नाही. आजचा युवक हा बदल मागतो आहे. त्यामुळे त्यांच्या तशा अपेक्षाही वाढल्या आहेत.

आम्ही युवकांच्या प्रश्नांसह ज्येष्ठांच्या प्रश्नापर्यंत पोहचणार आहोत. गोव्यातील जनतेच्या हक्कासाठी आमचा प्रयत्न असेल, असेही मनोज परब यांनी सांगितले. लंडनहूनही गोवेकरांचा संवाद आझाद मैदानावरील (Azad Maidan) सभा गाजविल्यानंतर ‘आरजी’चे प्रमुख मनोज परब यांच्याशी लंडनमध्ये असलेल्या गोमंतकीयांनी संवाद साधला.

Manoj Parab
वास्‍को, कुंकळ्‍ळीत महिलांनी व्यक्त केल्या अपेक्षा

मध्यरात्री 12.30 नंतर सुरू झालेला हा ‘व्हच्जुअल’ संवाद 1.30 वाजेपर्यंत सुरू होता. ‘उजो उजो’च्या जयघोष करीत लंडनमधील गोमंतकीयांनी परब यांना शुभेच्छा दिल्या. आमच्या तुझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तू गोमंतकीयांना न्याय देशील, गोव्यात आता खऱ्या अर्थाने बदलाची नांदी सुरू झाली आहे. रोजगारासाठी विदेशात जाणाऱ्यांना आता पर्याय उभे व्हायला हवेत, त्यासाठी ‘आरजी’ नक्कीच काहीतरी करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com