डिचोलीत कोरोना नियंत्रणात

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

डिचोली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असून, कालच्या तुलनेत आज बुधवारी तालुक्यात रुग्णसंख्येत कमालीची घट  झाली आहे. आज तालुक्यात केवळ ५ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत.

डिचोली:  डिचोली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असून, कालच्या तुलनेत आज बुधवारी तालुक्यात रुग्णसंख्येत कमालीची घट  झाली आहे. आज तालुक्यात केवळ ५ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तर डिचोलीतील कोविड सुविधा केंद्रात आजही एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळाली आहे. आज मये विभागात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही.

डिचोली विभागात केवळ २तर साखळी  विभागात 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. बुधवारी  डिचोली विभागात ३३ मये विभागात ३० आणि साखळी विभागात २४ मिळून तालुक्यात एकूण ८७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.

आज तालुक्यातील   मये विभागात ३ आणि साखळी विभागात ४ मिळून ७ रुग्ण बरे झाले आहेत. डिचोलीत-३०, मयेत-30 आणि साखळीत-२० मिळून ८० रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. डिचोलीतील ३ आणि साखळीतील ४ मिळून तालुक्यातील ७ रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली आहे.

 

संबंधित बातम्या