डिचोलीत शनिवारी १६ कोरोनाबाधित

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

चालू आठवड्यात कोरोनामुळे दोघांचे बळी गेले असले, तरी डिचोली तालुक्यात रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे आढळून आले आहे. शनिवारी दिवसभरात तालुक्यात १६ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. डिचोली विभागात ६, मये विभागात ७, तर साखळी विभागात ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे

डिचोली :  चालू आठवड्यात कोरोनामुळे दोघांचे बळी गेले असले, तरी डिचोली तालुक्यात रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे आढळून आले आहे. शनिवारी दिवसभरात तालुक्यात १६ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. डिचोली विभागात ६, मये विभागात ७, तर साखळी विभागात ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.

शनिवारी डिचोली विभागात ५४, मये विभागात ४३ आणि साखळी विभागात ६३ मिळून तालुक्यात एकूण १६० कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. आज डिचोली विभागात  १, मये विभागात ३ आणि साखळी विभागात ८ मिळून तालुक्यात १२ रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यातील १५ रुग्ण कोविड सुविधा केंद्रात उपचार घेत आहेत, तर डिचोलीत - ५०, मयेत - ३६ आणि साखळीत - ४२ मिळून १२८ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत.

डिचोलीतील ३, मयेतील ३ आणि साखळीतील ११ मिळून तालुक्यातील १७ रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली 
आहे.

संबंधित बातम्या