Goa Chirstmas: डिचोलीत नाताळ सणाचा माहोल

Dicholim: दुकाने सजली : रंगरंगोटीची कामे सुरू; खरेदीला होतेय गर्दी
Dicholim Market
Dicholim MarketDainik Gomantak

Dicholim: नाताळ म्हणजे ख्रिस्ती बांधवांचा उत्साह द्विगुणित करणारा सण. हा सण जवळ आल्याने डिचोलीत नाताळचा माहोल तयार झाला असून, शहरात लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. बाजारातील दुकानेही ख्रिसमस साहित्याने फुलू लागली आहेत.

सध्‍या ख्रिस्ती बांधव नाताळ सणाच्या तयारीला लागले आहेत. डिचोली शहरात ख्रिस्ती बांधवांची संख्या कमी असली, तरी नाताळ सण परंपरेप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो.

शहरातील बहुतांश दुकाने ख्रिसमसच्‍या साहित्याने सजली आहेत. या दुकानातून ख्रिसमस ट्री, स्नोबॉल, सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या, तयार गोठे आणि रंगीबेरंगी नक्षत्रे आदी सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीस उपलब्ध झाले आहे. त्याची खरेदीही जोरात करण्‍यात येत आहे. नाताळ सणासाठी लागणाऱ्या करंज्या आदी खाद्यपदार्थ बनविण्या लगबगही सुरू झालेली आहे.

Dicholim Market
Daboli Airport: ‘दाबोळी’वरील बुकिंग रद्द; दक्षिणेतील प्रवासी गोत्यात

ख्रिसमसनिमित्त घरांसह कपेल, क्रॉसची रंगरंगोटी करण्‍याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच गोठा सजावटीच्या कामाकडे लक्ष केंद्रित केले आहे. नाताळाच्या पूर्वरात्री शहरातील अवर लेडी ऑफ ग्रेस सायबिणीच्या चर्चमध्ये प्रार्थनासभा आदी कार्यक्रम होणार आहेत. येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारीत भव्य देखावे उभारण्याचे काम सुरू झाले असून पुढील चार-पाच दिवसांत शहरात ख्रिसमसचा माहोल तयार होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com