Bicholim Muncipality : डिचोलीत कामांची गती मंदावली

डिचोली पालिकेतर्फे यंदा गटारांसह नाले साफसफाई कामे उशिराने हाती घेण्यात आली.
Bicholim
BicholimGomantak Digital Team

Bicholim Pre-Monsoon Work: डिचोली शहरात माॅन्‍सूनपूर्व कामे सुरू करण्‍यात आली आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने पालिकेचे प्रयत्न आहेत.

मात्र कामाचा सध्याचा वेग पाहिल्‍यास ही कामे वेळेत पूर्ण होणार की नाहीत, याबद्दल साशंकता आहे. डिचोली पालिकेतर्फे यंदा गटारांसह नाले साफसफाई आदी कामे काहीशी उशिराने हाती घेण्यात आली आहेत.

पालिकेच्या चौदाही प्रभागांत गटार साफसफाईचे काम करण्यात येणार आहे. कंत्राट पद्धतीने हे काम करण्यात येत आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाअंतर्गत मान्‍सूनपूर्व कामे करण्यासाठी दहा लाख रुपये मंजूर झाल्‍याची माहिती उपलब्ध झाली आहे. डिचोलीत केबलद्वारे भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात येणार आहेत. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. काही ठिकाणी गटार साफसफाई करताना अडचण येतेय.

Bicholim
CM Pramod Sawant: राज्यात 10 प्रकल्पांना मंजुरी, तर 3 हजाराहून अधिक रोजगारसंधी

दलित बांधवांच्या वस्तीला टेकून नाईकनगर येथील नाल्यावरील साकवाचे काम पूर्ण झाले आहे. ३१ लाख रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे या नाल्यावर नव्याने साकवाची बांधणी करण्यात आली आहे. यापूर्वी दरवर्षी पहिल्या पावसात नाल्याच्या साकवाजवळील भाग तुंबून समस्या निर्माण होत असे. आता साकवाची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. त्‍यामुळे पावसाळ्यातील समस्या नियंत्रणात येण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे. लोकांनीही समाधान व्‍यक्त केले आहे.

Bicholim
G. Kishan Reddy: केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची प्रकृती खालावली, AIIMSमध्ये दाखल

गटारांवरील लाद्यांची स्‍थिती भयानक

डिचोलीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान तसेच आदी काही रहदारीच्या ठिकाणी गटारांवरील लाद्या व्यवस्थित बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना मन:स्ताप सहन करावा लागतोय.

साफसफाई कामाचे कंत्राट देण्यात आलेले आहे. पावसाळा जवळ आल्याने माॅन्‍सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. या कामांवर पालिकेचा कटाक्ष आहे. पावसाळ्यात समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी सर्व प्रभागांत कामे करण्यात येत आहेत. लवकरच ती पूर्ण करण्‍यात येतील.

पुंडलिक फळारी, नगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com