डिचोलीमध्ये मंगलमूर्तीच्या जयघोषात एक दिवसाची 'चवथ' साजरी

काही अपरिहार्य कारणामुळे मुळगावसह, साळ, मये आदी काही भागातील काही कुटुंबियांना गेल्या महिन्यात चतुर्थीवेळी गणपती पूजन करायला मिळाले नव्हते. त्यामुळे या गणेशभक्तांनी आज विनायक चतुर्दशीला गणपती पूजन करून एक दिवसाची 'चवथ' साजरी केली.
डिचोलीमध्ये मंगलमूर्तीच्या जयघोषात एक दिवसाची 'चवथ' साजरी
Dicholim : Ganesh Chaturthi 2021Dainik Gomantak

डिचोली:मंगलमूर्तीच्या जयघोषात डिचोलीतील (Dicholim) विविध भागात आज (शनिवारी) एका दिवसाची चतुर्थी उत्साहात (Ganesh Chaturthi) साजरी करण्यात आली. काही अपरिहार्य कारणामुळे मुळगावसह, साळ, मये आदी काही भागातील काही कुटुंबियांना गेल्या महिन्यात चतुर्थीवेळी गणपती पूजन करायला मिळाले नव्हते. त्यामुळे या गणेशभक्तांनी आज (शनिवारी) विनायक चतुर्दशीला गणपती पूजन करून एक दिवसाची 'चवथ' साजरी केली.

Dicholim : Ganesh Chaturthi 2021
शांतादुर्गा विद्यालयातर्फे वैमानिक रिचा गोवेकर हिचा सन्मान

सकाळी घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर मूर्तीची विधिवत स्थापना आणि पुजन करण्यात आले. गणपती पूजन केलेल्या घरोघरी आरत्यांचा निनाद घुमत होता. गणपती पूजन केलेल्या गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी उत्तरपूजा झाल्यानंतर गणपतीच्या मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, आदी जायघोषात पारंपरिक ठिकाणी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी बालगोपाळांसह महिलांही पुढे होत्या.

Related Stories

No stories found.