गोव्यातही असेच पत्र लिहिले का?

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोशियारी  यांच्याकडे गोवा राज्यांचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपालांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्रे लिहिली आहेत का?

मुंबई: राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोशियारी  यांच्याकडे गोवा राज्यांचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपालांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्रे लिहिली आहेत का?  असा प्रश्न महसूहमंत्री बाळआसाहेब थोरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. 

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून दारूची दुकाने उघडली तर मंदिरे बंद का अशी विचारणा केली आहे. थोरात यांनी म्हटले की, राज्यपालांच्या  या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का? राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही.

संबंधित बातम्या