गोवा नगरपालिका निवडणुक : प्रभागांच्या आरक्षणावरून भाजपमध्येच धुसफूस

सुहासिनी प्रभुगावकर
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

गोव्यामध्ये पालिका निवडणूक येत्या दोन महिन्यांमध्ये होणार आहे. प्रभागाच्या आरक्षणावरून घोळ सुरू आहे. अनेक जण या प्रकरणावरून न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत.

पर्वरी :  गोवा नगर पालिका निवडणुकीतील प्रभागांचे आरक्षण अधिक चांगल्या प्रकारे करता आलं असतं, हे आरक्षण ठरवताना आपल्याशी कोणीही सल्लामसलत केली नसल्याचं वक्तव्य गोव्याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी मंत्रालयात आज पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना केलं. त्यांना पालिका निवडणुकीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, “मी कधीच पंचायत किंवा पालिका निवडणुकीत हस्तक्षेप केलेला नाही. माझे समर्थक उमेदवार असतात ते निवडून येतात. त्यामुळे माझे उमेदवार निवडून येतात असे समजले जाते. जिल्हा पंचायत निवडणुकीतही माझा उमेदवार बिनविरोध निवडून आला होता, मला जे काही सांगायचे आहे ते मी सांगितले आहे, यावर आणखीन काही मी बोलणार नाही”, असे उत्तर त्यांनी दिले.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे भरा

गोव्यामध्ये पालिका निवडणूक येत्या दोन महिन्यांमध्ये होणार आहे. प्रभागाच्या आरक्षणावरून घोळ सुरू आहे. अनेक जण या प्रकरणावरून न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. पणजी महापालिकेच्या प्रभाग आरक्षणात हे घोळ झाल्याचा आरोप खुद्द भाजपच्या नगरसेवकांनी केलेला आहे. सरकारने विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी आरक्षणे बदलली,असा आरोप प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने केलेला आहे. या पार्श्वभूमीवर पंचायतमंत्री गुदिन्हो यांचे आजचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

गोवा कार्निव्हल : या फ्लाईट्समध्ये घेता येणार खास गोवन जेवणाचा आस्वाद

गोवा राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) पणजी शहर महानगरपालिका (सीसीपी) प्रभागांच्या आरक्षणाला अधिसूचित केले असून त्यातील काही प्रभागांचे विभाजन करून प्रभाग क्रमांक बदलण्यात आले आहेत. एसईसी आयुक्त चोखा राम गर्ग यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 14 प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 5 इतर मागासवर्गीय ,महिलांसाठी 7, ओबीसी महिलांसाठी 3 आणि अनुसूचित जातींसाठी 1 अशाप्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पणजीसह 11 नगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत.

संबंधित बातम्या