फोंड्यात बेवारस गुरांमुळे वाहनचालकांना अडचण

Dainik Gomantak
सोमवार, 6 जुलै 2020

शापूर-बांदोडा ते अमिगो कुर्टी-फोंडा दरम्यान चौपदरी महामार्गावरील उड्डाणपुले मोकाट गुरांची कोंडवाडे बनली असून उड्डाणपुलाखाली ठाण मांडून बसणारी ही गुरे वाहतुकीस
मोठी डोकेदुखी ठरत आहे.

फोंडा

शापूर-बांदोडा ते अमिगो कुर्टी-फोंडा दरम्यान चौपदरी महामार्गावरील उड्डाणपुले मोकाट गुरांची कोंडवाडे बनली असून उड्डाणपुलाखाली ठाण मांडून बसणारी ही गुरे वाहतुकीस
मोठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यात ही बेवारस गुरे मोकाट न फिरता उड्डाण पुलाखाली आसरा घेताना दिसून येत असून त्यामुळे उड्डाण पुल मोकाट गुरांसाठी कोंडवाडाच बनला आहे.
फोंडा शहरात व आजूबाजूच्या भागात हमखास हिंडणारी मोकाट गुरे रात्रंदिवस उड्डाणपुलाखाली बसून मोकळा श्‍वास घेताना दिसत आहे. उड्डाणपुलाखाली बसणारी ही बेवारस मोकाट गुरे
कोंडवाड्यासारखी रस्‍त्यावर अनेक ठिकाणी ठाण मांडून बसलेली आढळून येत असून सध्यातरी ती रहदारीला त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या या गुरांना चौपदरी महामार्गावरील पुल फायदेशीर ठरली असून पावसाळ्यात मोकाट गुरे उड्डाणपुलाखाली ठिकठिकाणी बसून आसरा घेत आहे. फोंडा शहरात किंवा आजूबाजूच्या भागात फिरणाऱ्या मोकाट गुरांना कोंडवाडा विना उड्डाणपुले
फायदेशीर ठरल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

GOA GOA GOA

 

संबंधित बातम्या