दिगंबर कामत यांचे खंदे कार्यकर्ते मॅथ्यू फर्नांडिस यांचे निधन

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 25 एप्रिल 2021

विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे खंदे कार्यकर्ते व प्रभाग 20 च्या माॅडेल मडगावच्या उमेदवार सॅंड्रा फर्नांडिस यांचे पती मॅथ्यू फर्नांडिस यांचे कोरोनामुळे निधन झाले. 

मडगाव ः विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे खंदे कार्यकर्ते व प्रभाग 20 च्या माॅडेल मडगावच्या उमेदवार सॅंड्रा फर्नांडिस यांचे पती मॅथ्यू फर्नांडिस यांचे कोरोनामुळे निधन झाले. 

मॅथ्यू फर्नांडिस हे अनेक वर्षांपासून कामत यांच्या सोबत होते. 2015 ची पालिका निवडणूक त्यांनी लढवली होती. यंदाच्या निवडणुकीत हा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने त्यांच्या पत्नी सॅंड्रा फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली. 

म्रथ्यू फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल कामत यांनी दुःख व्यक्त केले आहे. फर्नाडिस नेहमी दुसऱ्यांच्या भल्यासाठी वावरले. कोरोनाने आणखी एका निरपराध जीवाचा बळी घेतला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. 

संबंधित बातम्या