''भाजपाची 'ट्रोल आर्मी' वास्तविक इतिहास लपवून चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहे''

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

विश्वसनीय, अचूक  आणि खऱ्या माहितीतून राष्ट्र बांधणीसाठी कॉंग्रेस सोशल मीडियाकडे स्वताला जोडा असे आवाहन आज विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केले. पणजी येथील कॉंग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सोशल मिडियाचे माध्यम आजच्या युगात खूप गतीने लोकांपर्यंत माहिती पोहचवत असे सांगुन ती माहिती अचूक, विश्वसनीय आणि खरी असणे गरजेचे असल्याचे सांगितले.

विश्वसनीय, अचूक  आणि खऱ्या माहितीतून राष्ट्र बांधणीसाठी कॉंग्रेस सोशल मीडियाकडे स्वताला जोडा असे आवाहन आज विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केले. पणजी येथील कॉंग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सोशल मिडियाचे माध्यम आजच्या युगात खूप गतीने लोकांपर्यंत माहिती पोहचवत असे सांगुन ती माहिती अचूक, विश्वसनीय आणि खरी असणे गरजेचे असल्याचे सांगितले. तथ्यांवर आधारीत माहिती प्रसारित केली तरच राष्ट्रीय एकतेस त्याची मदत होते असे ते पुढे म्हणाले. 

गोव्यातील बैलांच्या झुंजी आयोजकांवर पोलिसांच्या खास पथकाचे लक्ष

मजबूत भारत घडविण्यात कॉंग्रेस पक्षाचे व नेत्यांचे खुप मोठे योगदान असून, ते जाणून घेण्यासाठी लोकांनी कॉंग्रेस सोशल मीडिया टीममध्ये सामील व्हावे असे दिगंबर कामत यांनी पुढे सांगितले. माजी केंद्रीय मंत्री आणि गोवा कॉंग्रेस समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. रमाकांत खलप, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यावेळी उपस्थित होते.

भाजपाची "ट्रोल आर्मी" आज भारताचा वास्तविक इतिहास लोकांपुढे न नेता, स्वताहून तयार केलेली चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहे. सत्ताधारी भाजप सरकार आज आपल्या राजकीय फायद्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची प्रतिमा डागाळण्याचे वारंवार प्रयत्न करीत आहे, असे दिगंबर कामत यांनी निदर्शनास आणून दिले. कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भारताच्या प्रगती व विकासासाठी दिलेले योगदान भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या सुवर्ण पानांवर कायम राहिल असे दिगंबर कामत यांनी पुढे सांगितले. 

स्वातंत्र्य चळवळीत आपल्या नेत्यांनी सहभाग घेतला होता असे दर्शविण्यास भाजपाकडे काहीच नसल्याने ते आता खोटी आख्यायिका तयार करून विद्यमान नेतृत्त्वाची भलावण  करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट आणि पीआर एजन्सीजच्या आधाराने सरकारचा डोलारा पिटला जात आहे. परंतु सौंदर्य प्रसाधनांचा तोंडाला लावलोला रंग अल्प काळासाठी असतो आणि एकदा तो रंग उतरला की खरा चेहरा समोर येतो असे  अ‍ॅड. रमाकांत खलप यावेळेस म्हणाले. 

भाजपा सरकारने जुमला आणि चुकीच्या पद्धतीने सत्ता बळकावली आहे.  सरकारच्या सर्व चुकीच्या धोरणांमुळे आज  जागतिक स्थरावर भारताला नुकसान झाले आहे व नाचक्की सोसावी लागली आहे. त्यामुळे भारताला मजबूत राष्ट्र म्हणून पुढे आणायला प्रत्येकाने सत्याचा अभ्यास केला पाहीजे  आणि जातीय सलोख्याचा आणि मानवजातीबद्दलचा सन्मानाचा संदेश प्रसारित केला पाहिजे. सर्व गोमंतकीयांना माझे आवाहन आहे की त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाकडे आपल्याला जोडून घ्यावे आणि आपले विचार तसेच आपल्या बहुमूल्य सूचनां द्याव्यात. कॉंग्रेस पक्ष आपली धोरणे ठरवताना ह्या सुचनांचा नक्कीच विचार  करेल असे अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले. त्यानंतर कॉंग्रेस सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी देखील युवकांना समाजमाध्यम मोहिमेत सहभागी होवुन देशातील लोकशाही मजबुत करण्याचे आवाहन केले. 

संबंधित बातम्या