"गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यास कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा"

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यास वचनबद्द असलेल्या कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे,

मडगाव: गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यास वचनबद्द असलेल्या कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले.  उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीवर या खेपेस कॉंग्रेसचाच झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

गोव्यातील भाजप सरकारने असंवेदनशीलतेची हद्द ओलांडली असून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज प्रत्येक गोमंतकीय आर्थिक बोजाखाली आहे व राज्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाली आहे, परंतु भाजप अजुनही उत्सवी वातावरणात वावरत असनू सामान्य लोक हालअपेष्टा सहन करीत असताना सरकार कोट्यवधी रुपयांचा वायफळ खर्च करीत आहे. स्वार्थाचे व सोयीचे राजकारण करणाऱ्या भाजपला गोमंतकीय जिल्हा पंचायत निवडणुकीत धडा शिकवतील, असा दावा कामत यांनी येथे  पत्रकार परिषदेत केला. कॉंग्रेसचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई, माजी नगराध्यक्ष डोरिस टेक्सेरा, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. येमेन डिसोझा यावेळी हजर होते. 

राज्य आर्थिक दिवाळखोरीत असताना गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमांवर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची नेमणूक करून सरकार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याचा प्रयत्न करीत आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्षपूर्तीचे आयोजन करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समिताच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी १९ डिसेंबर रोजी कला व संस्कृती खाते व कला अकादमीतर्फे गोमंतकीय कलाकारांचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. सरकारने गरजवंताना आधार द्यावा, शंभर कोटीचे पॅकेज जाहीर करावे तसेच वायफळ खर्च करू नये असे मत आम्ही लेखी सरकारकडे नोंदविले आहे, परंतु काल सरकारने निविदा जारी करून समितीवरील सदस्यांचा अपमानच केला आहे, असे दिगंबर कामत म्हणाले. 

आणखी वाचा:

गोव्यात जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात -

मुख्यमंत्र्यानी ताबडतोब ही निविदा रद्द करून केवळ गोमंतकीय कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करावे, अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे. सरकारने उधळपट्टी करणे बंद न केल्यास, कॉंग्रेस पक्ष पारंपरिक व्यावसायिक व दुर्बल घटकांना बरोबर घेऊन सरकार विरोधात आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला.

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप आघाडी घेईल -

कंत्राटदाराच्या मृत्यूची जबाबदारी 
सरकार घेईल का ः कामत

सरकारकडून बिलांची रक्कम वेळेत फेडली न गेल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचा एक कंत्राटदार प्रचंड दबावाखाली होता व त्यातच दोन दिवसांपूर्वी त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन त्याचे निधन झाले. हे त्याच्या कुटुंबियांकडून व मित्रांकडून ऐकुन मला धक्काच बसला. भाजप सरकार या कंत्राटदाराच्या मृत्यूची जबाबदारी घेणार का असा सवाल दिगंबर कामत यांनी विचारला आहे.

संबंधित बातम्या