शांताराम नाईक नवीन पिढीसाठी प्रेरणादायी - कामत 

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार अॅड. शांताराम नाईक यांचे गोवा व काॅंग्रेस पक्षासाठी मोठे योगदान असून नवीन पिढीसाठी ते सतत प्रेरणा देत राहतील असे उद्गार विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी येथे काढले. 

मडगाव : काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार अॅड. शांताराम नाईक यांचे गोवा व काॅंग्रेस पक्षासाठी मोठे योगदान असून नवीन पिढीसाठी ते सतत प्रेरणा देत राहतील असे उद्गार विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी येथे काढले. 

''पर्रिकरांच्या भ्र्ष्ट व स्वार्थी राजकारणाचा वारसा आप पुढे नेणार...

नाईक यांच्या 75 व्या जयंती दिनानमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष विठोबा देसाई, आल्तिन गोम्स, प्रवक्ते विठू मोरजकर, माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर, युवा काॅंग्रेसचे सरचिटणीस ग्लेन काब्राल, काॅंग्रेसचे नेते सिद्धनाथ बुयाव, गोवा प्रदेश महिला काॅंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष व शांताराम नाईक यांच्या पत्नी बिना नाईक व शांताराम नाईक यांचे पूत्र अर्चित उपस्थित होते. 

गोमेकॉ इस्पितळ ते दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळपर्यंत शटल सेवा सुरू करणार: विश्‍...

नाईक यांनी आपल्या कार्यातून सतत गोव्याचे हीत जपले. गोमंतकियांच्या समस्यांबद्दलही त्यांनी सतत आवाज उठवला. गोमंतकीय अस्मिता जपण्यासाठी त्यांनी संघर्ष केला असे कामत पुढे म्हणाले. नाईक हे काॅंग्रेसचे निष्ठावान नेते होते, असे चोडणकर यांनी सांगितले. काॅंग्रेस पक्षाने `नीज काॅंग्रेसमन` मोहीम सुरु केली आहे. नाईक यांची काॅंग्रेस प्रती असलेली निष्ठा काॅंग्रेस पक्षाची बांधणी करण्यासाठी आम्हाला प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले. 

 

संबंधित बातम्या