भाजप सरकारने लोकांना मूर्ख बनवू नये - दिगंबर कामत

दैनिक गोमन्तक
रविवार, 4 एप्रिल 2021

सेंटर फॉर मॉनिटरींग अनएप्लोयमेंट (सीएमआयई) यांनी जारी केलेल्या अहवालात बेरोजगारीत गोव्याला दुसरे स्थान मिळाल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लोकांना मूर्ख बनविण्याचे थांबवून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर द्यावा अशी टिका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

मडगाव : सेंटर फॉर मॉनिटरींग अनएप्लोयमेंट (सीएमआयई) यांनी जारी केलेल्या अहवालात बेरोजगारीत गोव्याला दुसरे स्थान मिळाल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लोकांना मूर्ख बनविण्याचे थांबवून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर द्यावा अशी टिका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. दिशाहीन भाजप सरकारने सन 2012 मध्ये सत्तेत आल्यापासुन राज्याला आर्थिक दिवाळखोरीत काढुन राज्याची अर्थव्यवस्थाच खिळखिळी केली आहे ,असे कामत म्हणाले. (Digambar Kamat strongly criticized BJP and Pramod Sawant on the issue of employment)

सीएमआयई संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीने गोव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगणाऱ्या भाजप सरकारचा दावा खोटा ठरला आहे. गोव्यात नविन रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या घोषणा करणाऱ्यांसाठी हे एक थप्पड असल्याचे  कामत म्हणाले. 2012 मध्ये सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने राज्यातील रोजगार संधी नष्ट केल्या. खाण व्यवसाय बंद करणे, पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यासाठी ठोस कृती न करणे, गोवा व्हिजन-2035 अहवाल कपाटात बंद करुन ठेवणे असे राज्याच्या हिताविरूद्धचे निर्णय या भाजप सरकारने घेतले व रोजगाराच्या संधीच बंद केल्या, असा दावा  कामत यांनी केला. 

पुढील 5 वर्षात पेडणे तालुका प्रथम क्रमांकावर: मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची...

2012 ते आजपर्यंत भाजप (BJP) सरकारने काय केले हे माजी लोकायुक्तांनी 21 भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याच्या दिलेल्या आदेशावरुन  गोमंतकीयांना कळले आहे. या शिवाय या सरकारकडे दाखविण्यासारखे काहीच नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यानी अर्थसंकल्पातुन "गोंयचे दायज" ही कॉंग्रेस सरकारने तयार केलेली योजना कार्यांन्वित करण्याचे जाहीर केले. आता मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस सरकारच्याच काळात तयार झालेला " गोवा व्हिजन-2035" अहवाल स्विकारुन तो अमलात आणावा. राज्याची घडी नीट बसवुन रोजगार संधी उपलब्द होण्यास त्यामुळे मदत होईल, असे कामत यांनी सांगितले. 

शिवाय, मुख्यमंत्र्यानी आतातरी राज्यातील छोट्या व्यावसायीकांना दिलासा देण्यासाठी आम्ही मागितलेली 100 कोटीची पॅकेज जाहीर करावी. सरकार कृती करण्यास मागे पडले तर बेरोजगारीत गोवा लगेच पहिला क्रमांक घेईल, असा इशारा  कामत यांनी दिला आहे. 

 

संबंधित बातम्या