Digambar Kamat to visit FIFA : फिफा पाहण्यासाठी दिगंबर कामत जाणार कतारला

पासपोर्ट तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा म्हापसा न्यायालयाचा आदेश
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak

Digambar Kamat to visit FIFA :सध्या कतार येथे चालू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पोर्तुगाल आणि उरुग्वे यांच्यातील सामना पाहण्यासाठी दोहा येथे जाण्यासाठी माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना म्हापसा न्यायलयाने परवानगी दिली असून त्यांचा पासपोर्ट तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिला.

दिगंबर कामत यांच्या विरोधात 2015 मध्ये दाखल केलेल्या लुईस बर्जर प्रकरणाची सुनावणी सध्या म्हापसा न्यायालयात सुरु आहे. या प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करते वेळी त्यांना त्यांचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करण्याची आणि न्यायालयाच्या परवानगी शिवाय देशाबाहेर न जाण्याची अट घातली होती. हा सामना पाहण्यासाठी आपल्या कुटुंबाबरोबर कामत 26 नोव्हेंबर रोजी कतारला जाण्यास बाहेर पडणार असून 29 नोव्हेंबर रोजी तिथून परत येणार आहेत.

Digambar Kamat
Pankaj Tripathi in IFFI : अॅक्टिंग करणं डोक्यातही नव्हतं; मात्र तो टर्निंग पॉईंट आला आणि सगळंच बदललं

मार्च महिन्यात इंग्लंड मध्ये रहाणारी आपल्या मुलीला भेटण्यासाठी आपण सहकुटुंब युकेला जाणार असून 1 ते 18 मार्च पर्यंत आपले वास्तव्य युकेला असणार असेही कामत यांनी म्हटले आहे. त्यासाठी व्हिसा मिळविण्या करता आपल्याला पासपोर्टची वैधता वाढवून घेण्याची गरज असल्याचे कामत यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. दिगंबर कामत यांच्या पासपोर्टची वैधता ऑगस्ट 2023 मध्ये संपत आहे. न्यायालयाने त्यांचा पासपोर्ट तात्पुरत्या स्वरूपात मुक्त करतांना विदेशात जाण्यासाठी काढलेली तिकिटे, मिळालेला व्हिसा आणि वैधता बदललेल्या पासपोर्टच्या प्रती न्यायालयाला सादर कराव्यात असे आदेशात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com