गोव्यातील टॅक्सींमध्ये बसविले जाणार डिजिटल भाडे मीटर; मिळणार या सुविधा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

प्रिंटर, जीपीएस आणि पॅनिक बटणासह डिजिटल भाडे मीटर लवकरच गोव्यातील सर्व टॅक्सींवर बसविण्यात येतील, असे राज्याचे परिवहन मंत्री मौविन गुतीन्हो यांनी सांगितले.

पणजी: प्रिंटर, जीपीएस आणि पॅनिक बटणासह डिजिटल भाडे मीटर लवकरच गोव्यातील सर्व टॅक्सींवर बसविण्यात येतील, असे राज्याचे परिवहन मंत्री मौविन गुतीन्हो यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना गुतींन्हो यांनी हे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल असे सांगितले. या संदर्भात शुक्रवारी गोवा विधानसभेत त्यांनी लेखी उत्तर सादर केले.

गुतीन्हो म्हणाले की, राज्य सरकारने गोवा मोटार वाहन नियम  कलम 140 मध्ये दुरुस्ती केली असून त्याअंतर्गत प्रत्येक मोटार कॅबला डिजिटल भाडे मीटरसह प्रिंटर, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) आणि पॅनीक बटण बसवणे अनिवार्य असणार आहे.

पणजीच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर 

“ई-निविदा काढल्यानंतर, कामकाजाच्या विक्रेत्यास यंत्रे पुरवण्यासाठी वर्क ऑर्डर देण्यात आला आहे. सरकारकडून लवकरच टॅक्सीवरील उपकरणांचे फिटमेंट सुरू करण्यात येइल,” असे ते म्हणाले.

गोव्यामध्ये 674 काळ्या पिवळ्या टॅक्सी आहेत. त्यापैकी 14,575 ऑल इंडियन टॅक्सी आहेत (राज्याबाहेर जाण्याची परवानगी असलेल्या) 2593 गोवा टॅक्सी आणि 2250 अ‍ॅप-आधारित टॅक्सी आहेत. याशिवाय, किनारी विभागात 1,246 मोटारसायकल टॅक्सी कार्यरत आहेत, राज्य सरकारने M/S फ्र्रोटामाइल्स प्रायव्हेट लिमिटेड अ‍ॅप-आधारित कॅब अ‍ॅग्रीगेटरला गोवा माईल्स चालविण्यास परवानगी दिली आहे, असेही परीवहन मंत्र्यांनी सांगितले.

Corona Update: गोव्यात होळी, ईद, इस्टरच्या आधी  कलम 144 लागू 

संबंधित बातम्या