गोव्यात डिजीटल मीटर्सची 20 मे पासून टॅक्सींना सक्ती 

goa taxi 1.jpg
goa taxi 1.jpg

पणजी : ज्या टॅक्सीना ((Taxi)  डिजीटल मीटर्स (Digital Meters) बसविलेले नसतील त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण 20 मे 2021 पासून केले जाणार नाही. ज्यांच्या परवान्याची मुदत 20  मे पूर्वी संपणार असेल त्यांना डिजीटल मीटर्स वेळापत्रकात नमूद केलेल्या दिवसांपूर्वी बसविण्याची मुभा देण्यात येणार आहे. वाहतूक खात्याने डिजीटल मीटर्स बसविण्यासाठी दिलेल्या वेळपत्रानुसार ते बसविले नाहीत त्यांचा परवाना रद्द केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व टॅक्सींना डिजीटल मीटर्स बसविलेले असतील. ज्‍या टॅक्सींना हे मीटर्स नसतील त्यांचा परवाना रद्द होणार आहे.  (Digital meters in Goa will force taxis from May 21) 

टॅक्सीचा शेवटचा क्रमांचा 0  किंवा 1  असेल त्यांनी 1  जुलै ते 24  जुलै या काळात मीटर्स बसवावेत व ते बसविल्यास 25  जुलैपासून परवाना रद्द होणार आहे. त्याचप्रमाणे 2  किंवा 3  क्रमांकासाठी 26  जुलै ते 18  ऑगस्टपर्यंत मुदत व मीटर्स न बसविल्यास 19  ऑगस्टनंतर परवाना रद्द, क्रमांक 4  किंवा 5  साठी 19  ऑगस्ट ते 11  सप्टेंबर मुदत व मीटर्स न बसविल्यास 12 सप्टेंबरला परवाना रद्द, क्रमांक 6 किंवा 7  साठी 13  सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत मुदत व मीटर्स न बसविल्यास 7  ऑक्टोबरला परवाना रद्द, क्रमांक 8  किंवा 9  साठी 7 ऑक्टोबर ते 30  ऑक्टोबरपर्यंत मुदत व मीटर्स न बसविल्यास 1  नोव्हेंबरला परवाना रद्द होईल. 

डिजीटल मीटर्ससह ऑटोमोटिव्ह ट्रॅकिंग यंत्र, पॅनिक बटन (इमर्जन्सी सिस्टीम) व प्रिंटर्स तसेच एक वर्षाचा मोफत दुरुस्ती, एक वर्षाचा डेटा तसेच ऑनलाईन मॉनिटरींग शुल्क ज्यामध्ये जीएसटीचा समावेश असून एकूण खर्च सुमारे11  हजार 234 रुपये आहे. डिजीटल मीटर्स बसविल्यानंतर टॅक्सी मालकाने जवळच्या वजनमापे कार्यालयाशी भेटून हे मीटर्स प्रमाणित घेणे सक्तीचे आहे असे संचालकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com