दिकरपाल-नावेली येथे भंगारवाहू ट्रकला आग

dainik gomantak
सोमवार, 1 जून 2020

अग्नीशामक दलाच्या जवानांना ही आग विझविण्यासाठी एक बंब लागला.

सासष्टी,

दिकरपाल नावेली येथे भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागण्याची घटना आज दुपारी १.३० वाजता घडली. ट्रकमध्ये भंगार ओवरलोड असल्यामुळे विद्युत वहिनीला लागून शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्यावर अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
ओवरलोड भंगार घेऊन जाणारा ट्रक दिकरपाल नावेली येथून जात असताना, ट्रकमधील भंगार विद्युत वहिनीला लागले. विद्युत वहिनीला लागताच शॉर्टसर्किट झाला व ही आग लागली. ट्रकमध्ये असलेल्या भंगारालाच आग लागल्याने जीवितहानी झाली नाही. पण, यात ट्रकमधील भंगार जाळून खाक झाले व सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्यावर अग्नीशामक दलाला कळविल्यावर दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण आणले.

 

संबंधित बातम्या