लेखा संचालकपदी दिलीप हुम्रस्कर

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

ते जून १९८९ मध्ये लेखापाल या पदावर लेखा संचालनालयात रुजू झाले होते. त्यानंतर आता संचालनालयातील सर्वोच्च पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.

पणजी

राज्य सरकारच्या लेखा संचालकपदी दिलीप हुम्रस्कर यांना सरकारने बढती दिली आहे. ते उद्या संचालकपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. सध्या ते संयुक्त संचालक म्हणून काम पाहात होते.
हुम्रस्कर यांना या पदावर बढती द्यावी अशी शिफारस गोवा लोकसेवा आयोगाच्या अख्यत्यारीतील खात्यांतर्गत बढती समितीने केली होती. हुम्रस्कर हे मुळचे आगरवाडा- पेडणे येथील असून ते सध्या शिवोली येथे वास्तव्यास आहेत. लेखा संचालक प्रकाश परेरा हे आज सेवेतून निवृत्त झाल्याने हुम्रस्कर यांना ही बढती मिळाली आहे. ते जून १९८९ मध्ये लेखापाल या पदावर लेखा संचालनालयात रुजू झाले होते. त्यानंतर आता संचालनालयातील सर्वोच्च पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.

 

 

संबंधित बातम्या

Tags