Margao मध्ये दिंडी उत्सव भक्तिभावाने साजरा

विविध स्पर्धांना प्रतिसाद, दिंडीला भाविकांची गर्दी
Margao मध्ये दिंडी उत्सव भक्तिभावाने साजरा
Margao मध्ये दिंडी उत्सव भक्तिभावाने साजराsoiru Komarpant

फातोर्डा: मडगावात आज साजरा झालेला112 वा वार्षिक दिंडी उत्सव भक्तिभाव साजरा करण्यात आला. यंदा शहरातून पालखी मिरवणूक व गायन बैठका नसूनही भाविकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

श्री हरिमंदिरात आज सकाळपासून भक्तांची ये-जा चालू होती. संध्याकाळच्या वेळी कोंबवाडा येथील श्री विठ्ठल मंदिरात व दामबाबाच्या सालातही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचे चित्र होते. श्री हरिमंदिरात सकाळी धार्मिक विधी नंतर सुरेंद्र बोरकर व साथीचा भजनाचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी भक्तीरंग, मडगाव तर्फेही युवा कलाकारांनी भजनाचा कार्यक्रम झाला. तसेच संध्याकाळी मंदिरा सभोवताली श्री विठ्ठल रखुमाईच्या धार्मिक ग्रंथासह प्रदक्षिणेचा कार्यक्रम पार पडला. दिंडीही उत्साहात काढण्यात आली.लोकांची जास्त गर्दी नगरपालिका चौकात होती. त्यामुळे नगरपालिका ते स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडील रस्ता वाहतुकीस बंद केल्याने काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. तरी पोलिस बंदोबस्त उत्तम होता त्यामुळे त्याचा जास्त परिणाम जाणवला नाही. नगरपालिका चौकात तसेच श्री विठ्ठल मंदिर परिसरात खाजेकार, खेळणी वाले, खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे मांड व गाडे थाटल्याने दिंडी उत्सवास भाविकांची मोठी गर्दी होती.

soiru Komarpant

आज उत्सवाची सांगता

शिवाय सोलिड पार्टीतर्फे रांगोळी स्पर्धा, सम्राट क्लब तर्फे पणती सजावट स्पर्धा, दामबाबाले घोडेतर्फे आयोजित दिंडी पथक स्पर्धा, आकाशकंदील स्पर्धांना चांगला प्रतिसाद लाभला. 18 रोजी दुपारी 12.30 वाजता श्री हरि मंदिरात होणाऱ्या गोपाळकाला, महाआरती व तिर्थप्रसादाने दिंडी उत्सवाची सांगता होणार आहे.

soiru Komarpant

शौनक अभिषेकींची मैफल रंगली

दिंडी उत्सवात वार्षिक गायन बैठका झाल्या नाहीत. मात्र पं. शौनक अभिषेक यांची मैफल रंगली, बोलावा विठ्ठल कार्यक्रमाअंतर्गत भक्ती, भाव व नाट्यगीते सादर करण्यात आली. त्यांनी संगीत रसिकांना गायनाचा एक सुंदर नजराणा पेश केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com