गोव्याच्या काँग्रेस प्रभारीपदी दिनेश गुंडू राव

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

दिनेश गुंडू राव यांच्याकडे गोव्यासह तमीळनाडू व पुडुचेरीच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गोव्याचे पूर्वीचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार आता ओडिशाच्या प्रभारीपदी नेमण्यात आले आहेत.

पणजी: गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई (मांडवी) नदीचे पाणी कर्नाटकाकडे वळवले पाहिजे, या विचारांचे समर्थन करणारे दिनेश गुंडू राव यांची काँग्रेसने गोव्याच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. 

राव यांच्याकडे गोव्यासह तमीळनाडू व पुडुचेरीच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गोव्याचे पूर्वीचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार आता ओडिशाच्या प्रभारीपदी नेमण्यात आले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी याविषयीचा आदेश जारी केला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या