सत्ता स्थापनेनंतर गोव्याच्या अस्मितेला आणि पर्यावरणाला धोकादायक प्रकल्प हद्दपार करू

सत्ता स्थापनेनंतर गोव्याच्या अस्मितेला आणि पर्यावरणाला धोकादायक प्रकल्प हद्दपार करू
Dinesh Gundu Rao

मडगाव : डॉ. राम मनोहर लोहिया, डॉ. ज्युलिओ मिनेझिस न अनेक ज्ञात- अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी(Goa revolution day) आयुष्य पणाला लावले. आपल्या  स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याची(Goa) स्वतंत्र ओळख राखण्यासाठी प्राधान्य दिले, आणि त्यासाठी संघर्ष केला. त्यांनी पाहिलेली स्वतंत्र आणि स्वाभिमानी गोव्याची स्वप्ने पूर्ण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळेच 2022 मध्ये सत्तास्थापन केल्यानंतर काँग्रेस पक्ष गोव्याच्या अस्मितेला आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे सगळे प्रकल्प रद्द करेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव(Dinesh Gundu Rao) यांनी मडगाव येथे लोहिया मैदानावर  केले.  

75 व्या गोवा क्रांति दिनानिमित्त काँग्रेसच्यावतीने मडगाव येथील लोहिया मैदानात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी हुतात्मा स्मारक व डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगांवकर आणि गोपाळ चितारी यांचा पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला. 

यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माजी मंत्री आलेक्स सिकेरा, मडगावच्या उप-नगराध्यक्ष दिपाली नाईक, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एम. के.शेख, अल्तिनो गोम्स, प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्ष बीना नाईक, दक्षिण गोवा काँग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, मडगाव विभाग अध्यक्ष गोपाळ नाईक, प्रियोळ विभाग अध्यक्ष हेमंत नाईक आणि मान्यवर उपस्थित होते.  माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर यांनी सर्वांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन केले. 

गोवा स्वातंत्र्य संग्रामाच्या आजच्या या ऐतिहासिक दिवशी आम्ही आज गोंयकारांचा आवाज म्हणून सदैव काम करत राहू अशी प्रतिज्ञा करत आहोत. राज्याची समृद्ध परंपरा, ओळख, अस्मितेच्या जपणुकीसाठी आणि समृद्धतेसाठी आम्ही पक्ष म्हणून नेहमीच जबाबदारीने काम करु. काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्य गोंयकारांचा पक्ष राहिला आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खामध्ये आम्ही सोबत असतो. गोमंतकीय जनमताचा आदर करत आम्ही सेझ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आमचे सरकार हे जनसामान्यांचे सरकार असून जनतेच्या प्रत्येक भावनेचा आम्ही यथोचित आदर करतो, असेही यावेळी दिनेश गुंडू राव यांनी नमूद केले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dainik Gomantak (@dainikgomantak)

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com