Silly Souls Cafe & Bar : ‘सिली सोल्स’ सुनावणीवेळी लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश

23 मार्चपर्यंत अंतिम सुनावणी
Silly Souls Café and Bar | Smriti Irani
Silly Souls Café and Bar | Smriti IraniDainik Gomantak

Silly Souls Cafe & Bar : केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबीयांकडून कथितपणे चालवल्या जाणाऱ्या आसगाव येथील वादग्रस्त ‘सिली सॉल्स कॅफे अँड बार’ संदर्भात उत्पादन शुल्क आयुक्त नारायण गाड यांनी गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी एक आदेश दिला होता. याविरुद्ध ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी दिलेल्या आव्हान अर्जावर मुख्य सचिवांनी दोन्ही पक्षांना 20 मार्चपर्यंत लेखी युक्तिवाद दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावरील सुनावणी 23 पर्यंत अंतिम सुनावणीसाठी ठेवली आहे.

Silly Souls Café and Bar | Smriti Irani
Colvale Jail : कोलवाळ कारागृहात नेमके चालले आहे तरी काय?

उत्पादन शुल्क परवाना अँथनी डी गामाच्या नावावर असला तरी, जीएसटी क्रमांक तसेच सिली सॉल्स कॅफे अँड बारद्वारे वापरलेले अन्न आणि औषध परवाना हे सर्व एइटॉल फूड अँड बेव्हरेजेसच्या नावावर आहे, जे कार्यरत आहे. उग्रया मर्चंटाईल प्रा. लि. या कंपनीच्या केंद्रीय मंत्र्यांचे पती हे संचालक आहेत, असा युक्तिवाद ॲड. रॉड्रिग्ज यांनी केला.

Silly Souls Café and Bar | Smriti Irani
Air Quality: जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या प्रदूषित शहराला मागे टाकत मुंबई बनले गॅस चेंबर

एटॉल फूड अँड बेव्हरेजेसचा सिली सोल्स कॅफे अँड बारशी अँथनी डीगामाच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. उत्पादन शुल्क परवाना कायदेशीरपणेच घेण्यात आला आहे, असा युक्तिवाद डिगामा यांच्या वकिलांनी केला. मुख्य सचिवांनी दोन्ही पक्षांची काही वेळ बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांना लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com