पोलिस महासंचालक मीणा यांनी जाणून घेतल्या सांग्यातील समस्या

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020


दिवसभर निरीक्षण, माहिती जाणून घेत महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी एकूण माहिती संकलन केली. विचुन्द्रे आऊट पोस्ट चांगले असल्याचे सांगितले व लोकांमध्ये सौहार्द वाढविण्याचा सल्ला पोलिस कर्मचाऱ्यांना दिला.

सांगे : गोवा राज्याचे पोलिस महासंचालक मुकेशचंद्र मीणा यांनी सांगे पोलिसस्थानक, राखीव पोलिस दल, विचुन्द्रे आऊट पोस्ट या भागाला भेट देऊन पाहणी केली व एकंदर परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग, पोलिस अधिकारी शेखर प्रभुदेसाई, प्रबोध शिरवईकर, सांगेचे पोलिस निरीक्षक सचिन पन्हाळकर व इतर अधिकारी उपस्थित होते. 

महासंचालक मीणा यांनी प्रथम चंद्रेश्वर पोलिस राखीव दलाच्या केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तेथील परिस्थितीची जाणीव करून घेतली व त्यानंतर सांगे पोलिस स्थानकाला भेट दिली. यावेळी सांगे पोलिस स्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांची संपर्क सभा घेऊन समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर सांगे व्यापारी संघटना, ज्येष्ठ नागरिक, ट्रकमालक संघटना, मोटारसायकल, रिक्षा, टेम्पो संघटना यांच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी सांगेतील नागरिक आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगे पोलिस निरीक्षक चांगली कामगिरी बजावीत असून कायदा आणी सुव्यवस्था राखली जात असल्याचे सांगण्यात आले. 

दिवसभर निरीक्षण, माहिती जाणून घेत महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी एकूण माहिती संकलन केली. विचुन्द्रे आऊट पोस्ट चांगले असल्याचे सांगितले व लोकांमध्ये सौहार्द वाढविण्याचा सल्ला पोलिस कर्मचाऱ्यांना दिला.

संबंधित बातम्या