घरीच राहून उपचार घेणाऱ्यांसाठी 'होम आयसोलेशन किट'चे अनावरण

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

राज्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्रांमधून(PHC) हे संच वाटले जाणार आहेत. हे संच मोफत दिले जाणार असून घरी राहून उपचार घेण्याला प्राधान्य देणाऱ्या रूग्णांनाच हे संच पुरवण्यात येतील

पणजी- राज्याच्या आरोग्य संचालनालकडून घरीच राहून उपचार घेणाऱ्यांसाठी अलगीकरण संचाचे (Home Isolation kit) चे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्य संचालक जोस डिसुझा, आरोग्य सचिव अमित सरोजा आणि ज्योती सरदेसाई उपस्थित होते.

यात संचांत, ऑक्सीमीटर, तापमापक, स्पिरोमीटर, सॅनिटायझऱ, एन- ९५ मास्क, तीन पदरी मास्क, हातमोजे, विटॅमिन सी गोळ्या, विटॅमिन डी गोळ्या आणि हायड्रोक्सीक्लोरिक्वीन औषधाचाही समावेश आहे. राज्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्रांमधून(PHC) हे संच वाटले जाणार आहेत. हे संच मोफत दिले जाणार असून घरी राहून उपचार घेण्याला प्राधान्य देणाऱ्या रूग्णांनाच हे संच पुरवण्यात येतील, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी यावेळी दिली.   

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाबद्दलही बोलताना ते म्हणाले की, येथील दुसरा वॉर्ड पूर्णपणे डेडीकेटेड कोविड वॉर्ड म्हणून रूपांतरीत केला जाणार आहे. आमचे संघ कोविडच्या फास्ट ट्रॅकिंग पद्धतीचा अवलंब करत असून कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिचारिकांनाही गोमेकॉत नियुक्त्या देण्याचा विचार होत असल्याचे यावेळी ते म्हणाले.      
 

संबंधित बातम्या