बंद दाराआड मुख्यमंत्री व उपसभापती यांच्यात चर्चा

दाराआड चर्चा झाल्यानंतर उपसभापती हसत मुखाने बाहेर
बंद दाराआड मुख्यमंत्री व उपसभापती यांच्यात चर्चा
Goa Chief MinisterDainik Gomantak

काणकोण: बंद दाराआड मुख्यमंत्री सावंत व उपसभापती यांची चर्चा त्यानंतर उपसभापती हसत मुखाने बाहेर पडले. सचिवालयात बंद दाराआड मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) व उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांची सुमारे अर्धातास चर्चा झाली. मात्र त्यानंतर उपसभापती हसत मुखाने बाहेर आले असे त्यांच्या सोबत गेलेले लोलयेचे सरपंच सचिन नाईक,माजी सरपंच अजय लोलयेकर व काणकोण पालिकेचे नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी सांगितले.

Goa Chief Minister
Goa Recruitment: ‘GHRDC’मध्ये रोजगाराच्या संधी!

बुधवारी संध्याकाळी उशीरा उपसभापती व लोलयेचे सरपंच नाईक, माजी सरपंच लोलयेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.बंद दाराआड कोणती चर्चा झाली हे कळण्यास मार्ग नसला तरी उमेदवारी बाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक संदेश देऊन काम करत रहा असा संदेश दिल्याचे सरपंच नाईक यांनी सांगितले.

यावेळी लोलयेचे सरपंच व माजी सरपंच लोलये पंचायत क्षेत्रातील विकास कामांची मागणी घेऊन उपसभापती समवेत मुख्यमंत्र्यांना भेटले.यावेळी लोलये येथील ग्रामीण उप आरोग्य केंद्राचे मोडकळीस आलेल्या भाड्याच्या जागेतून पंचायत कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सर्व शिक्षा अभियानाच्या वापारात नसलेल्या वास्तूंत स्थलांतर करणे, पंचायत क्षेत्रातील तीन पेट्रोल पंपच्या ऑक्ट्रोय महसुलाचा वाटा पंचायतीला देणे या व इतर मागण्याचे निवेदन सरपंचांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

Goa Chief Minister
Goa Election: अनेकांना तिकिटे नाकारली जातील : मुख्यमंत्री

त्याशिवाय पंचायत क्षेत्रातील ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रत्येकी दोन विकास कामाना मंजुरी देणे तसेच पंचायत क्षेत्रातील पथदिप व रस्त्याच्या कामाना वित्तीय मंजूरी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.मुख्यमंत्र्यानी लवकरच पंचायत क्षेत्रातील सर्व कामाना मंजुरी देण्यात येणार असल्याचे सांगितले.येणाऱ्या विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात भाजपचे सरकार पूर्नस्थापित करण्यासाठी उपसभापती बरोबर काम करण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सरपंच नाईक यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.