शिरोडा ग्रामपंचायतीत विकासकामांवर चर्चा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

कोरोना महामारीच्या गेल्या आठ महिन्याच्या काळात आणि त्याच्यातच गेले पाच महिने पडणाऱ्या पावसामुळे शिरोडा मतदारसंघातील विविध गावातील विकासकामे अडून राहिली आहेत. या सर्वच कामांना आता गती देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी केले. 

शिरोडा : कोरोना महामारीच्या गेल्या आठ महिन्याच्या काळात आणि त्याच्यातच गेले पाच महिने पडणाऱ्या पावसामुळे शिरोडा मतदारसंघातील विविध गावातील विकासकामे अडून राहिली आहेत. या सर्वच कामांना आता गती देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी केले. 

मंगळवार २० रोजी बाजार शिरोडा येथे शिरोडा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत शिरोडकर बोलत होते. शिरोडा मतदारसंघातील विकास कामे अडून राहिल्याने ती चालीस लावण्यासाठी विविध खात्याचे अधिकारी, अभियंते यांच्याबरोबरच शिरोडा पंचायतीचे सरपंच अमित शिरोडकर, उपसरपंच साल्वासाव फर्नांडिस, पंचायत सदस्य  शिवानंद नाईक, मेघनाथ शिरोडकर, पल्लवी शिरोडकर, श्रीकांत नाईक, गाब्रियाल मास्करेन्हस आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार शिरोडकर म्हणाले, शिरोडा बोरी, बेतोडा निरंकाल पंचवाडी गावात वारंवार वीज खंडीत होण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, सर्व गावाना सुरळीत पाणीपुरवठा केला जावा तसेच गावातील नादुरुस्त रस्त्याचे दुरुस्तीकामासाठी हाती घ्यावे. कोणतीच कामे खोळंबून रहाता कामा नये.

यावेळी सरपंच अमित शिरोडकर, उपसरपंच साल्वासाव फर्नांडिस आणि पंचसदस्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आपापल्या परिसरातील समस्या दूर करण्याच्या सूचना केल्या. अभियंते, अधिकारी यांनी सुचनाची नोंद करून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी कामाला लागण्याची तयारी दर्शविली. सरपंच अमित शिरोडकर यांनी स्वागत केले तर शिवानंद नाईक यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या