Goa Taxi: आम्ही तुम्हाला निवडून आणले, म्हणत टॅक्सी व्यावसायिकांची आमदार सोपटे यांच्याकडे चर्चा

आम्ही तुम्हाला निवडून आणले आम्ही आमच्या गाड्या घेवून तुमच्यासोबत फिरलो, सिंगल चहा सुद्धा घेतला नाही. असे म्हणत सोपटेंना प्रचारादरम्यानची आठवण करून दिली.
गोवा टॅक्सी व्यावसायिक
गोवा टॅक्सी व्यावसायिकDainik Gomantak

मोरजी: पर्यटन टॅक्सी (Goa Taxi) व्यावसायिक कोणत्याही परिस्थितीत मीटर (Meters) बसवणार नाही, वेळप्रसंगी मोबाईल अ‍ॅप (Mobile App) स्विकारणार, परंतु अगोदर माईल्स रद्द करा आणि व्यावसायिकांना परमिट रद्द करण्याच्या आलेला नोटीसा मागे घ्याव्यात अशी मागणी मांद्रे मतदार संघातील पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांनी (Goa Taxi Meters) आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांची मांद्रे येथे भेट घेतल्यानंतर केली.

सुरुवातीला आमदार सोपटे यांनी दहा जण कुणीही येवून कार्यालयात चर्चा करावी, टॅक्सी व्यावसायिकांनी सुचना अमान्य केल्याने आमदार सोपटे यानी कार्यालयाबाहेर येवून चर्चा केली, जर एक एक व्यावसायिक प्रश्न विचारतील तर उत्तरे मिळतील अन्यथा सॉरी असे सोपटे म्हणताच शांतपणे व्यावसायिकांनी आपल्या समस्या मांडत असताना आम्हाला गोवा माईल्स नको, आम्ही मीटर बसवणार नाही त्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. वेळ प्रसंगी मोबाईल अ‍ॅप स्विकारले जाईल. शिवाय वाहतूक खात्याकडून परमिट रद्द करण्याच्या ज्या नोटीसा व्यासवायिकांना पोहचलेल्या आहेत त्या मागे घ्याव्यात, आमदार या नात्याने आमच्या समस्या आमच्या आमदाराने सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली.

गोवा टॅक्सी व्यावसायिक
Goa : करंझोळवासीयांचा भूमिपुत्र आंदोलनाला पाठिंबा

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना आपण आमदार नसताना गोवा माईल्स अ‍ॅप आणले गेले. मीटर बसवण्याचा आदेश हा न्यायालयाने दिला त्यामुळे आपण त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, मात्र इतर जे विषय आहे ते आपण पुढच्या आठवड्यात काही व्यावसायिकांसह या. आपण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे चर्चा करून या विषयी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सोपटे यांनी सांगितले.

मग सर्वच आमदार गप्प का ?

पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी विधानसभेत छातीठोकपणे आपण मोबाईल अ‍ॅप आणल्याचे सांगितल्यावर चाळिसातील एकही आमदाराने ब्र काढला का नाही असा प्रश्न उपस्थित केला. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर ज्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले , त्यावेळी ते कोणत्या भाषेत तेथील नागरिकांकडे बोलले असा सवाल करून मंत्री आजगावकर यांनी टॅक्सी व्यावसायीकाना बदनाम करण्यापूर्वी माईल्स रद्द करण्याची मागणी केली. त्यावर आमदार दयानंद सोपटे यांनी आपण त्या मंत्र्याच्या विषयात पडणार नाही असे सांगितल्यावर , व्यावसायिक थोडे आक्रमक बनले त्यांनी आम्ही तुम्हाला निवडून आणले आम्ही आमच्या गाड्या घेवून तुमच्यासोबत फिरलो, सिंगल चहा सुद्धा घेतला नाही. असे म्हणत सोपटेंना प्रचारादरम्यानची आठवण करून दिली. त्यावर आमदार सोपटे यांनी तुमचे प्रश्न आपण तुमच्या समक्ष मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्याकडे मांडतो असे सांगितले.

गोवा टॅक्सी व्यावसायिक
Goa Politics: चिदंबरम यांच्याकडून युतीबाबत चर्चा शक्य

टॅक्सी व्यावसायिकांनी आमचा व्यवसाय वाचवण्यासाठी सरकारने भुमिपुत्राना मदत करावी. बिगर गोमंतकियाना मदत करण्यापेक्षा स्थानिकाना सहकार्य करावे अशी मागणी केली. काही व्यावसायिकांनी आता पर्यटन हंगाम सुरु होणार आहे त्यामुळे वाहतूक खात्याने लवकरच परमिटचे नुतनीकरण करावे त्यासाठी आमदारांनी मदत करण्याची मागणी केली असता आमदार सोपटे यांनी आपण या विषयी तुमच्या समक्ष वाहतूक मंत्र्याकडे बोलणी करतो असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com