कुळे बाजारात जंतूनाशक फवारणी

प्रतिनिधी
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

कुळे-शिगाव पंचायत क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मिळत असून, त्यामध्ये पंचायतचे कचरा गोळा करणारे स्वीपर व चालक यांचाही समावेश असल्याने कुळे शिगाव पंचायत इमारत व कुळे बाजारात अग्निशामक दलाचे अधिकारी अतुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व फायर फायटर शशीकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली साईप्रसाद नाईक, फ्रांन्सिसओ क्लेमेंट व चालक रोहन गावस यांनी परिसरात जंतूनाशक फवारणी केली.

धारबांदोडा: कुळे-शिगाव पंचायत क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मिळत असून, त्यामध्ये पंचायतचे कचरा गोळा करणारे स्वीपर व चालक यांचाही समावेश असल्याने कुळे शिगाव पंचायत इमारत व कुळे बाजारात अग्निशामक दलाचे अधिकारी अतुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व फायर फायटर शशीकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली साईप्रसाद नाईक, फ्रांन्सिसओ क्लेमेंट व चालक रोहन गावस यांनी परिसरात जंतूनाशक फवारणी केली.

कुळे शिगाव पंचायत हा धारबांदोडा तालुक्यात येत असून, दिवसेंदिवस या तालुक्यातील इतर पंचायत क्षेत्रात ‘कोविड-१९’चे रुग्ण मिळत असल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे. सध्या गणेशचतुर्थी अगदी जवळ आल्याने अशा परिस्थितीत गणेशचतुर्थी साजरी करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कुणाच्याही घरात रुग्ण आढळल्यास संपूर्ण गावात घबराट निर्माण होणार आहे. गणेशचतुर्थी हा हिंदू धर्मातील मोठा सण. ‘कोरोनाच्या’ माहामारीत हा सण साजरा प्रत्येकांनी स्वतःची काळजी घेऊन तसेच घराबाहेर जाताना तोंडावर मास्क व सॅनिटायजर बरोबर घेऊन जावे. कुठल्याही वस्तूला हात लावताना लगेच सॅनिटायज लावणे आवश्यक आहे, असे आवाहनही सरपंच गंगाराम लांबोर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या