भाजप सरकार त्‍वरित बरखास्त करा; काँग्रेसची मागणी

काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी : सरकार सर्वच पातळ्‍यांवर अपयशी ठरल्‍याचा आरोप
Goa Politics: BJP and Congress
Goa Politics: BJP and CongressDainik Gomantak

सासष्टी : राज्‍यातील असक्षम भाजप सरकारला काँग्रेस पक्षाने आंदोलनातून अनेक प्रश्न उपस्थित केले. पण सरकारकडून कधीच उत्तर मिळाले नाही. लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या विधानसभा अधिवेशनात काँग्रेसने आजही प्रश्न उपस्थित केले. तरीही भाजप सरकारकडून उत्तर न मिळाल्याने विरोधकांना सभात्याग करावा लागला. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून राज्यपालांनी ते त्‍वरित बरखास्‍त करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

Goa Politics: BJP and Congress
सामाजिक योजनांचे रखडलेले पैसे मिळणार 19 डिसेंबरपूर्वी; CM सावंत

वेळ्ळीतील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते ॲडोनिस कुलासो यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानिमित्त मडगाव येथील दक्षिण गोवा काँग्रेस कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर बोलत होते. भाजप सरकारला कोरोनास्थिती तसेच ऑक्सिजनची समस्या हाताळण्यास आलेले अपयश, दरदिवशी वाढणारे इंधनाचे दर, खाण व्यवसाय व अन्य मुद्यांवर आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न विचारले. परंतु सरकारकडून कधी उत्तरच मिळाले नाही. आता दोन दिवशीय बोलाविण्यात आलेल्या अधिवेशनातही उत्तर देणे शक्य होत नसल्याने या सरकारला एकही दिवस सत्तेत राहण्याचा हक्क नाही, असे चोडणकर म्‍हणाले.

काँग्रेसला पराभूत करणे भाजपला शक्य होत नसल्यामुळे हा पक्ष बाहेरील पक्षांना गोव्यात आणत आहे. पण तरीही काँग्रेसवर काहीही परिणाम होत नसल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गोव्यात आणून विकास केल्याचे सांगवे लागत आहे. भाजपने विकास केला असता तर शहा यांना गोव्यात आणण्याची गरजच भासली नसती. जो पक्ष 26 ते 28 आमदार निवडून येणार असल्याची वक्तव्ये करीत होता, तोच पक्ष आज युतीची भाषा करत आहे. यावरुन भाजपमध्ये निर्माण झालेला गोंधळ साफ दिसून येतो, असे चोडणकर म्‍हणाले. आज विविध क्षेत्रांतील लोक काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी गोवा सज्ज झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Goa Politics: BJP and Congress
‘व्हिजनरी’च्या गुंतवणूकदारांना मदत करा;आलेक्स रेजिनाल्ड

यावेळी गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख, वेळ्ळीचे माजी आमदार बेंजामिन सिल्वा, दक्षिण गोवा काँग्रेस समिती अध्यक्ष ज्‍यो डायस व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपचा कुटिल डाव

कर्नाटकातील भाजप सरकारने सर्व चर्चचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचे गोव्यात होणाऱ्या निवडणुकीत ध्रुवीकरण करण्याचा हेतू आहे. गोव्यातील अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून भाजप सरकार कर्नाटकातून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला. हा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जो भाजप 26 ते 28 आमदार स्‍वबळावर निवडून येण्‍याची वक्तव्ये करीत होता, तोच पक्ष आज युतीची भाषा करत आहे. यावरुन भाजपमध्ये निर्माण झालेला गोंधळ दिसून येतो. हे सरकार सर्वच पातळ्‍यांवर अपयशी ठरले आहे.

- गिरीश चोडणकर, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com