मतदार यादीतून गाळलेल्या नावांची यादी प्रदर्शित

मतदार यादीतून गाळलेल्या नावांची यादी प्रदर्शित
election voter list

मुरगाव:कोणत्याही छानणीविना १४०० मतदारांची नावे यादीतून वगळली होती.याविरोधात काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी आवाज उठवून वगळलेल्या नावांची यादी प्रदर्शित करा अन्यथा प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत नेऊ असा गर्भित इशारा देताच मामलेदार कार्यालयातून नावांची यादी प्रदर्शित केली आहे.
मुरगाव मतदारसंघ क्षेत्रातील विविध प्रभागातील सुमारे १४०० मतदारांची नावे मुरगावच्या मामलेदारांनी मतदार यादीतून वगळली होती.बीएलओवर दबाव आणून हा बेकायदेशीर प्रकार घडला होता.याची माहिती काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांना मिळताच त्यांनी मामलेदार सतिश प्रभू यांची भेट घेऊन कोणत्याही छानणीविना मतदार यादीतून नावे वगळण्याचा प्रकार चुकीचा आहे.कोणाची नावे गाळली याची यादी प्रदर्शित करा अन्यथा निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असा इशारा दिला.त्यानंतर मामलेदारांनी मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांच्या नावांची यादी मुरगाव मतदारसंघातील त्या त्या मतदान केंद्रावर प्रदर्शित केली आहे.यावर लगेच सुनावणीही चालू केली आहे.
मुरगाव मतदारसंघातील भाजपचे नगरसेवक आणि काही कार्यकर्त्यांनी मतदारांना अंधारात ठेवून त्यांची नावे यादीतून गाळलेली आहेत.हे बहुतेक मतदार काँग्रेस समर्थक आहेत असे श्री.आमोणकर यांचे म्हणणे आहे. दरम्यान, १४०० नावे गाळल्यानंतर अतिरिक्त सुमारे ७५० नवीन नावे यादीत समाविष्ट करण्यात आली असून, त्यातील बहुतेकांचा मुरगावात कुठेच थांगपत्ता नसल्याचे आढळून आले आहे.यावरुन मुरगावात बोगस मतदार यादीत समाविष्ट करण्यात येत असल्याचा आरोप श्री. आमोणकर यांनी केला आहे.याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा देताच मुरगाव मामलेदार सतिश प्रभू यांनी तातडीने गाळलेले मतदार आणि नवीन मतदारांची यादी प्रदर्शित केली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com