आरोग्यमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या वादाचा गोवा आरोग्य सेवेला फटका

The dispute between Health Minister Vishwajit Rane and CM Pramod Sawant has now taken a big turn
The dispute between Health Minister Vishwajit Rane and CM Pramod Sawant has now taken a big turn

पणजी: कोविड महामारीत सरकारचे(Goa Government) प्रयत्न अपुरे पडत असल्याने सरकार निष्क्रीय ठरल्याची भावना जनमानसात प्रबळ झाली आहे. सरकारवरील विश्वास उडाल्याने ठिकठिकाणच्या ग्रामपंचायती, पालिका यांनी आपल्या परिसरात टाळेबंदी(lockdown) जाहीर करणे सुरु केले आहे. जनतेने असे करू नये, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवाहन करूनही त्याला कोणी प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे(Vishavajit Rane) व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod sawant) यांच्यातील सुप्त संघर्षाने आता मोठे स्वरूप घेतले असून त्याचा फटका राज्यातील आरोग्यसेवेला बसत असल्याची खात्री जनतेला झाली आहे.(The dispute between Health Minister Vishwajit Rane and CM Pramod Sawant has now taken a big turn)

आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या मागण्या या महामारीच्या काळात केल्या आहेत, हा खरेतर अंतर्गत संवादाचा विषय मात्र तो प्रसार माध्यमांकडे पोचल्यावर हा संघर्ष किती वळणावर पोचला आहे, याची कल्पना साऱ्यांना आली आहे. प्राणवायू पुरवठ्याचा विषय मुख्यमंत्री हाताळत आहेत, असे सांगून आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या साऱ्याची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही तासांनी एकटा कोणी काही करू शकत नाही. ही सारी सामूहिक जबाबदारी आहे व सर्वांनी एकत्र मिळून काम करायचे आहे, अशी जाहीर समज देण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील उदाहरण घेतले, तरी सरकारी कारभाराचा चेहरा कसा अमानवीय होत गेला आहे, हे दिसून येते. गोमेकॉच्या जुन्या इमातीतील कोविड वॉर्डात सिलिंडरने वैद्यकीय प्राणवायू पुरवला जातो. एक सिलिंडर संपल्यावर तो बदलून मिळेपर्यंत तीन तास जातात. त्या काळात रुग्णाची प्राणवायूची पातळी घसरते आणि ते रुग्णाच्या जीवावर बेतू शकते असे ड़ॉक्टरांचे म्हणणे होते. हा विषय़ मुख्यमंत्र्यांना म्हणे ठाऊकच नव्हता. ते आज गोमेकॉच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कालही माझे आरोग्यमंत्र्यांशी प्राणवायू पुरवठ्याबाबत बोलणे झाले, त्यांनी हा विषय माझ्यासमोर मांडला नव्हता.

गोमेकॉत ट्रॉलीतून वैद्यकीय प्राणवायू पुरवला जातो. एकावेळी तीन ट्रॉली लावल्या जातात. त्याऐवजी त्या ठिकाणी टाकी बसवून प्राणवायू पुरवण्याची आधुनिक सोय करणे आवश्यक होते. मुख्यमंत्र्यांनीही गोमेकॉच्या पाहणीनंतर हा बदल फारपूर्वी करणे गरजेचे होते हे मान्य केले. आता टाकी उपलब्ध नाही ती उपलब्ध झाल्यावर नवी यंत्रणा तत्काळ बसवू असे नमूद करण्यासही ते विसरले नाहीत. त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या आरोग्यमंत्र्यांना त्यांना मु्ख्यमंत्र्यांशी समन्वयाचा कोणता प्रश्न आहे का अशी विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी प्रश्न ऐकला न ऐकल्यासारखे केले तर आरोग्यमंत्री काही प्रश्न नाही, असे सांगतच मुख्यमंत्र्यांच्या गाडीपर्यंत जाताना मागे वळून न पाहता म्हणाले. परत येताना त्यांना माध्यमांशी बोलणार का? असे विचारल्यावर बोलायचे नाही असे म्हणत त्यांनी तेथून जाणे पसंत केले.

अधीक्षकांना समज
वॉर्डातील प्राणवायू पुरवठा आता सुरळीत होईल. तेथे लागणारे सिलिंडर वेळेवर मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. पुरवठ्यावर लक्ष ठेवणारे पथक आता वार्डात किती सिलिंडर लागतील, त्याचे नियोजन करून सिलिंडर संपण्याआधी सिलिंडर पुरवतील, असे मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. यामुळे गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक इतके दिवस काय करत होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोमेकॉत काम करणारे डॉक्टर व वैद्यकीय अधीक्षक यांच्यात संवाद असू नये, तोही कोविड महामारीसारख्या काळात ही भयंकर गोष्ट आज उघड झाली. याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांना समज दिल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, तरी गोमेकॉच्या कारभाराचे पितळ उघडे पडल्यावाचून राहिले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com