घाऊक मासळी मार्केटमध्ये आजही वाद; मासळी विक्रेते व सोपो कंत्राटदार आमने सामने

Disputes in the wholesale fish market today Fish sellers and simple contractors face to face
Disputes in the wholesale fish market today Fish sellers and simple contractors face to face

मडगाव: दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाच्या  (एसजीपीडीएच्या) घाऊक मासळी मार्केटमधील विक्रेता संघटना व सोपो कंत्राटदारामध्ये सुरु असलेला वाद आजही कायम राहिला. कंत्राटदाराचे सोपो गोळा करणारे कमर्चारी व विक्रेता संघटनेचे सदस्य एकमेकाच्या विरोधात उभे ठाकल्याने मार्केटमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

घाऊक मासळी विक्रेता संघटनेने आज सोपो कंत्राटदार मिलाग्रीस फर्नांडिस यांना सोपो देण्यास नकार देऊन सोपो कराची रक्कम एसजीपीडीएकडे जमा केली. मिलाग्रीस फर्नांडिस यांना  एसजीपीडीएने सोपो गोळा करण्याचे कंत्राट दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सोपो देण्यात येणार नाही, अशी भूमिका मासळी विक्रेता संघटनेने घेतली आहे. मिलाग्रीस आपल्यास हवा त्या दराने सोपो कर आकारत असून मासळीत फाॅर्मेलीन असल्याची अफवाई पसरवत असल्याचा आरोप करून संघटनेने त्याच्याविरुद्ध फातोर्डा पोलिसात मंगळवारी तक्रार दाखल केली होती. (Disputes in the wholesale fish market today Fish sellers and simple contractors face to face)

कंत्राटदार मिलाग्रीस व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आज दुपारी घाऊक मासळी मार्केटचे फाटक बंद केल्याने काही मासळीवाहू वाहने आत अडकून पडली. फातोर्डाचे पोलिस निरीक्षक कपिल नायक स्थितीवर नजर ठेवून आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com