Goa Congress: बंडखोर आमदारांच्या गट विलीनीकरणविरोधात काँग्रेसची सभापतींकडे तक्रार

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी दिली माहिती
Girish Chodankar
Girish ChodankarDainik Gomantak

गोवा काँग्रेसने आठ बंडोखोर आमदारांच्याविरोधात एक याचिका यापुर्वीच दाखल केलेली आहे. या याचिकाद्वारे गोवा काँग्रेसने बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसाठी दाद मागितली आहे. यापुढे जात गोवा काँग्रेसने आता बंडखोर 8 आमदारांच्या गट विलीनीकरणविरोधात सभापतींकडे तक्रार केली आहे.

(Disqualification petitions filed against 8 Congress MLAs who joined the BJP)

Girish Chodankar
Traffic Jam in Panaji : Ironman 70.3 साठी वाहतुकीत बदल; शहरात 'ट्रॅफिक जॅम'

मिळालेल्या माहिती नुसार गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज राजधानीत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी आठ बंडखोर आमदारांचा गट भाजपमध्ये विलीनकरण्याला आव्हान देत गोवा विधानसभा सभापतींकडे तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती दिली आहे. त्यामुळे गोवा विधानसभा सभापती रमेश तवडकर या तक्रारीवर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Girish Chodankar
Goa Agriculture: शेतकऱ्यांना स्वयंभू बनविण्यासाठी युवकांनी पुढे यावे- रमेश तवडकर

आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता

गोवा काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयानुसार बंडखोर आमदारांच्या भाजपमधील प्रवेशावरुन पुन्हा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आज डॉमनिक नोरोन्हा तसेच गिरीश चोडणकर यांनी वेगवेगळ्या अशा दोन तक्रार दाखल केल्या आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या भाजप प्रवेशावरुन सभागृहात ही आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com