रोटरी क्लब ऑफ म्हापसातर्फे पायलटांना कडधान्य वाटप

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

रोटरी क्लब ऑफ म्हापसा, इलाइटतर्फे बार्देश तालुक्यातील पायलट बांधवांना दीपावलीच्या पूर्वसंध्येला कडधान्याचे वाटप करण्यात आले. 

कुचेली : रोटरी क्लब ऑफ म्हापसा, इलाइटतर्फे बार्देश तालुक्यातील पायलट बांधवांना दीपावलीच्या पूर्वसंध्येला कडधान्याचे वाटप करण्यात आले. 
यावेळी रोटरीचे गव्हर्नर अजय मेनन, रोटरी क्लब ऑफ म्हापसा इलाइटचे उदय रेडकर, सचिव नारायण आजगावकर, दत्ताराम  बिचोलकर, पायलट संघटनेचे सुदेश ठाकूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

ठाकूर यांनी रोटरी क्लब ऑफ म्हापसा इलाइटने कोविड काळात एक चांगला उपक्रम राबविल्याबद्दल आभार मानले. अजय मेनन यांनी रोटरी क्लब ऑफ म्हापसा इलाइटचे कौतुक करताना रोटरी क्लब ऑफ म्हापसा इलाइटच्या मेडिकल बँकेचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. दत्ताराम यांनी मनोगत व्यत केले. 

पुरस्कर्ते सदानंद आरोलकर, विराज गावकर यांनी आभार मानले. सुरवातीला प्रकाश पिळर्णकर यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकिशोर आरोलकर यांनी परीश्रम घेतले. नारायण आजगावकर यांनी आभार मानले. यावेळी म्हापशातील ३५ मोटार सायकल पायलट बांधवांना कडधान्य वाटप करण्यात आले.

संबंधित बातम्या