मांद्रेत शेतकऱ्यांना खत, बियांणांचे वाटप

Nivrutti Shirodkar
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

मांद्रे मतदारसंघांतील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना बियाणे, खत, तसेच रोपट्यांचे वाटप करण्याचा आपला उद्देश आहे. शेतकरी आहे म्हणून आज आपल्याला अन्न मिळते. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी आपण काळजी घेत आहे. आपण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सदैव तयार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेती करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी केले.

निवृत्ती शिरोडकर

मोरजी :

आपला देश कृषी प्रधान आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेती करून आपले उत्पादन वाढवावे. शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षभरात लागणाऱ्या सर्व सुविधा आपण पुरविणार आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ घेऊन शेतीचे अधिकाधिक उत्पादन करावे, असे आमदार सोपटे म्हणाले. मांद्रे येथे आयोजित केलेल्या रोपटे वितरण कार्यक्रमात आमदार सोपटे बोलत होते.
मांद्रे येथे रोपटे वाटप कार्यक्रम करण्यात आले. यावेळी नारळ, चिकू, पेरु, आंबा या कलमांचे वाटप करण्यात आले. यावेळी मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे, पंच सदस्य डेनिस ब्रिटो, महादेव हरमलकर, संतोष बर्डे, आबा सांवत, धनंजय शेटगावकर, अनिल आसोलकर यांच्‍यासह अन्‍य नागरिक उपस्थित होते. यावेळी संतोष बर्डे, महादेव हरमलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. आतापर्यंत मांद्रे मतदारसंघात एकूण १० हजार विविध झाडांचे वाटप करण्‍यात आल्याचे त्‍यांनी सांगितले.

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या