‘टु गेदर पीस फॉर एव्हरीवन’तर्फे म्हापशात मास्कचे वितरण

वार्ताहर
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

"टु गेदर पीस फॉर एव्हरीवन, ऑल रिलिजस सिमिलर " या मुस्लिम बांधवांच्या युथ संघा तर्फे कोविड १९''वर मात करण्यासाठी म्हापसा पालिका परिसरात 300 मास्कचे वितरण करण्यात आले. या वेळी युथ संघांचे अध्यक्ष रिहान सय्यद, आफताब सय्यद, असिक खतिप, साहिल महाजन, यश काळोजी, मौला अली, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी लोकांना मास्क वितरित केले.

म्हापसा: "टु गेदर पीस फॉर एव्हरीवन, ऑल रिलिजस सिमिलर " या मुस्लिम बांधवांच्या युथ संघा तर्फे कोविड १९''वर मात करण्यासाठी म्हापसा पालिका परिसरात 300 मास्कचे वितरण करण्यात आले. या वेळी युथ संघांचे अध्यक्ष रिहान सय्यद, आफताब सय्यद, असिक खतिप, साहिल महाजन, यश काळोजी, मौला अली, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी लोकांना मास्क वितरित केले. यावेळी इथे उपस्थित असलेले म्हापसा पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुधिर कांदोळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, म्हापशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याच्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्थानिक आरोग्य केंद्र आम्हाला सर्वतोपरी मदत करीत आहेत. म्हणून आपण गप्प न राहता तोंडावर मास्क, हाताला सॅनिटायझर लावणे, वारंवार व्यवस्थित हात धुणे, अंतराचे भान ठेवणे आवश्यक आहे. आजच्या बकरी ईद या सणा निमित्त मुस्लिम बांधव युवकांनी हे मास्कचे वितरण केले त्याबाबत कांदोळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संदीप फळारी यांनी आपले मत मांडताना सांगितले की, मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण मोठा असतो. या दिवसाचे औचित्य साधून मुस्लिम बांधव युवा वर्गाने लोकांना मास्कचे वाटप केले आणि आपल्या परीने कोरोना हटावावर मदत कार्य सुरु केले. आज कोरोना मुळे जगावर एक मोठे संकटं आलेले आहे. यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने काळजी घ्यावी.म्हापसा येथील एक समाज सेविका मोना कवळेकर यांनी बोलताना सांगितले की कोरोनाच्या दृष्टीने मास्क गरजेचे आहे. प्रत्येकाने आपला जीव धोक्यात न घालण्यासाठी घरी राहावे किंवा घराबाहेर पडताना मास्क तोंडाला घालून बाहेर पडावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नयेअसे त्या म्हणाल्या.    "टु गेदर पीस फॉर एव्हरीवन, ऑल रिलिजस सिमिलर"चे अध्यक्ष रिहान सय्यद यांनी सांगितले की कोविड १९''वर मात करण्यासाठी हिंदू, मुस्लिम, क्रिश्चन व इतर समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन प्रत्येकाला आपआपल्या परीने सहकार्य करावे, सुरक्षित अंतर ठेवावे, मास्क घालावे. म्हापशात कोरोना रुग्ण वाढत आहेत याची भीती लोकांना झालेली आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले.

संबंधित बातम्या