कुडचडे सावर्डे रोटरी क्लबतर्फे कडधान्य वितरण

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

आपल्या आरोग्याची काळजी घेत दुसऱ्यांच्या घरातील आणि शहर परिसरातील कचरा साफ करणे हे आजच्या कठीण परिस्थितीत केलेले काम हे केवळ चार पैसे मिळणार म्हणून केले जाणारे काम नसून ही तर खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब अध्यक्ष सिद्धेश नाईक तारी यांनी केले. 

कुडचडे: आपल्या आरोग्याची काळजी घेत दुसऱ्यांच्या घरातील आणि शहर परिसरातील कचरा साफ करणे हे आजच्या कठीण परिस्थितीत केलेले काम हे केवळ चार पैसे मिळणार म्हणून केले जाणारे काम नसून ही तर खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब अध्यक्ष सिद्धेश नाईक तारी यांनी केले. 

कुडचडे सावर्डे रोटरी क्लबच्यावतीने कुडचडे भागात घरोघरी फिरून कचरा गोळा करणाऱ्या कुडचडे पालिका क्षेत्रातील पंचेचाळीस सफाई कामगारांना रोटरी क्लबतर्फे कडधान्य वितरण प्रसंगी श्री. तारी यांनी त्‍यांच्‍या कार्याप्रती गौरवोद्‍गार काढले. यावेळी कुडचडे पालिका नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर, क्लबचे सेक्रेटरी शांतेश सावर्डेकर, विनायक चोडणकर, डॉ. परेश कामत, पालिका क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनाचे संयोजक रुजारियो दांतास यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.  यावेळी सफाई संयोजक रुजारियो दांतास यांच्या हस्ते पंचेचाळीस कर्मचाऱ्यांना तांदूळ, डाळ, गूळ, बिस्कीट यासह अन्‍य वस्‍तू देण्‍यात आले.

संबंधित बातम्या