जिल्हा पंचायत निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान

दैनिक गोमन्तक
बुधवार, 2 डिसेंबर 2020

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याचिकेतील प्रतिवादी राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग व पंचायत खात्याला नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी येत्या ८ डिसेंबरला ठेवली आहे.

पणजी: कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर संस्थगित ठेवण्यात आलेली जिल्हा पंचायत निवडणूक पुन्हा घेण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीलाच केवल मयेकर व सुदीप ताम्हणकर यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. ही याचिका आज सुनावणीस आली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याचिकेतील प्रतिवादी राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग व पंचायत खात्याला नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी येत्या ८ डिसेंबरला ठेवली आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाची काल बैठक झाली व येत्या १२ डिसेंबरला निवडणूक घेण्यासंदर्भातचा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे. त्यामुळे या याचिकेमुळे या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक संस्थगित ठेवून ९ महिने उलटून गेले आहेत. निवडणूक पुढे ढकलताना आचारसंहिता उठविण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा ही निवडणूक घेण्यासाठी आचारसंहिता लागू होणार आहे ती घटनेनुसार होऊ शकत नाही. पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया घेण्याची गरज आहे असा दावा याचिकादारांनी केला आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या