बाळ अपहरण प्रकरण; DNA नमुना पुण्यातील प्रयोगशाळेकडे

DNA image.jpg
DNA image.jpg

पणजी: बाळाच्या अपह्रत तपासप्रकरणी बाळासह त्याचे पालक व संशयित विश्रांती गावस हिच्या ‘डीएनए’ चाचणी नमुना पुण्यातील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (CFSL) पाठविला आहे. त्याचा अहवाल मिळण्यास किमान एक महिना लागेल. त्यानंतरच अधिकृतरित्या बाळाची आई कोण? याचा पुरावा स्पष्ट होणार आहे, अशी माहिती आगशी पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांनी दिली. (DNA sample from the child abduction case was sent to a laboratory in Pune)

संशयित विश्रांती गावस हिला बाळाच्या अपहरणप्रकरणी आगशी पोलिसांनी गेल्या शनिवारी अटक केली होती. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे, ती उद्या 17 जूनला संपत असल्याने शुक्रवारी 18 जूनला तिला रिमांड वाढवून घेण्यासाठी बाल न्यायालयात उभे केले जाणार आहे. संशयित विश्रांती हिने जामिनासाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी त्याच दिवशी ठेवण्यात आली आहे.  

बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळ परिसरातून एक महिन्याच्या बाळाचे अपहरण झाले होते. अपहरण करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यास उत्तर गोव्यातील पोलिस फौज कामाला लावण्यात आली होती. मिळणाऱ्या माहितीच्या आधारे दिवसरात्र त्याचा पाठपुरावा करत अखेर त्या महिलेपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आले. प्रथम या संशयित महिलेने घरातील बाळ आपलेच असल्याचा दावा केल्याने तसेच गावातील लोकांनीही त्याला दुजोरा दिल्याने पोलिसांचीही धांदल उडाली होती. मात्र तिला पोलिस स्थानकात आणल्यावर तिने बाळाचे अपहरण केल्याची कबुली दिली होती, तसेच बाळाच्या अधिकृत आईनेही त्याची ओळख पटविल्याने पोलिसांनी विश्रांतीला पुढील चौकशीसाठी पोलिस स्थानकात आणले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com