पतसंस्थांच्या लेखापरीक्षणासाठी चार्टर्ड अकाउंटटची सक्ती करू नको

dainik Gomantak
बुधवार, 6 मे 2020

सहकार निबंधक कार्यालयाने राज्यातील पतसंस्थांचे ऑडिट करण्यासाठी सक्तीने चार्टर्ड अकाउंटट नेमण्यासाठी काढलेले परिपत्रक यावर्षी स्थगित ठेवावे, अशी मागणी राज्य सहकार संघातर्फे सहकार निबंधकांकडे केली आहे.

मोरजी

सहकार निबंधक कार्यालयाने राज्यातील पतसंस्थांचे ऑडिट करण्यासाठी सक्तीने चार्टर्ड अकाउंटट नेमण्यासाठी काढलेले परिपत्रक यावर्षी स्थगित ठेवावे, अशी मागणी राज्य सहकार संघातर्फे सहकार निबंधकांकडे केली आहे
राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष उदय प्रभू यांनी सादर केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की सहकार निबंधक कार्यालयातर्फे काढण्यात आलेल्या २४ जानेवारी २०२० परिपत्रकानुसार राज्यातील पतसंस्थांचे लेखापरीक्षण करण्यासाठी निबंधक कार्यालयातर्फे मान्यता दिलेल्या चार्टर्ड अकाउंटटची नियुक्ती करण्याचे बंधन घालून त्यांच्या नावाला वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता घेण्याची सक्ती केली आहे. त्यासाठी पतसंस्थांना पुन्हा एकदा विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवावी लागणार आहे. मात्र, कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू असल्याने तशी सभा घेणे शक्य होणार नाही, तसेच अनेक पतसंस्थांनी यापूर्वीच आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन निबंधक कार्यालयातर्फे मान्यता दिलेल्या ऑडिटरची नियुक्ती केली आहे. अनेक पतसंस्थांनी आपले अंतर्गत ऑडिट पूर्ण केले आहे. मात्र, निबंधक कार्यालयातर्फे अचानक काढलेल्या नव्या परिपत्रकाची अमलबजावणी करणे सध्या तरी शक्य नसल्याने अनेक पतसंस्थांचे ऑडिट होऊ शकलेले नाही. त्यात लॉकडाऊनच्या काळात पतसंस्थांची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. त्यात वेळेवर ऑडिट न झाल्यास त्याचा परिणाम पतसंस्थांवर होणार आहे. त्यामुळे सरकारने गांभिर्याने विचार करून निबंधक कार्यालयाने काढलेले परिपत्रक यावर्षी तरी लागू करू नये त्याची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या